घरकुलाच्या रकमेसाठी वृद्ध विधवेची चार वर्षांपासून फरपट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:44+5:302021-03-08T04:27:44+5:30

गोंदिया : शासकीय काम आणि महिनाभर थांब असे विनोदाने म्हटले जात असले तरी ही शासकीय कार्यालयांची वास्तविकता आहे. पंतप्रधान ...

Elderly widow for four years for house money () | घरकुलाच्या रकमेसाठी वृद्ध विधवेची चार वर्षांपासून फरपट ()

घरकुलाच्या रकमेसाठी वृद्ध विधवेची चार वर्षांपासून फरपट ()

googlenewsNext

गोंदिया : शासकीय काम आणि महिनाभर थांब असे विनोदाने म्हटले जात असले तरी ही शासकीय कार्यालयांची वास्तविकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२२ पर्यंत प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकारण्याचे आश्वासन देत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील शासकीय दप्तर दिरंगाईमुळे एका वृद्ध विधवा महिलेला चार वर्षांपासून घरकुलाची रक्कम न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. मात्र यानंतरही प्रशासनाला पाझर फुटला नसल्याचे चित्र आहे.

इंदिरा कोरे, रा. डोंगरगाव परसोडी, तालुका सडक अर्जुनी असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ती एक विधवा व निराधार महिला आहे. ती एका सधन शेतकऱ्याची पत्नी होती. पती यशवंत कोरे यांनी शेताला लागून घर बांधले. काही वर्ष सुखात घालविले. एक दिवस प्रकृती बिघडली. त्यात ते दगावले. इंदिरा विधवा झाल्या. नवे बांधलेले घरही कोसळले. डोक्यावर छत नाही. शेजाऱ्यांनी आश्रय दिला. एका कवेलू खोलीत जगण्याचा संघर्ष नशिबी आला. त्यात जगू लागल्या. मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घरकुल मिळावे यासाठी त्यांनी ग्रामपंचायतपासून ते पंचायत समितीपर्यंत अनेकदा पायऱ्या झिजविल्या; पण तिला घरकुल मिळाले नव्हते. लोकमतने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी हा मुद्दा तेव्हा जि.प.च्या आमसभेत उचलून धरला होता. तेव्हा तत्कालिन सीईओ रवींद्र ठाकरे यांनी याची दखल घेतली. घरकुल मंजूर केले. तशी घोषणा केली. दुसऱ्या दिवसी ते बदलून नागपूरला आले. वर्षभराने घरकुलाचे काम सुरू झाले. ४० हजार रुपये मिळाले. मात्र उरलेली रक्कम मिळेना. अखेर महिला बचत गटाने आर्थिक मदत केली. त्या मदतीचे व्याज ५० हजार रुपये झाले. या व्यवहाराने महिला बचत गट आणि इंदिरा कोरे अडचणीत आल्यात.

.......

तर पैस कुठून परत करणार?

इंदिरा कोरे यांनी सरपंच, सभापती, खंडविकास अधिकाऱ्यांचे कितीदा उंबरठे झिजविले. हाताला काम नसेल त्या दिवशी पदाधिकाऱ्यांच्या दारात असते. अनेकदा काम बुडवूनही. तरी कोणाला पाझर फुटत नाही. दोन दिवसांपूर्वी आमदाराच्या पीएला भेटली. हे घरकुल कोणत्या योजनेत मंजूर झाले. ते सुद्धा चक्रावले. इंदिराबाईला एवढेच माहीत सरकारने ४० हजार रुपये दिले. उरलेले दोन हप्ते केव्हा देणार? कर्ज घेतले. घरकुल पूर्ण केले; पण त्या चढत्या व्याजाचे काय? प्रत्येक उंबरठ्यावर जाते. अश्रू ढाळते. आजही ढाळत आहे. रडल्याशिवाय तोंडात घास जात नाही. पैसे मागणारे घरी येतात. वाटेल ते बोलतात. सरकारनेच दिले नाही. माझी दोन वेळच्या जेवणाची सोय नाही. तर कुठून पैसे परत करणार? हा त्या माउलीचा सवाल.

Web Title: Elderly widow for four years for house money ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.