चार ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:15 AM2017-10-15T00:15:26+5:302017-10-15T00:15:38+5:30
जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १६ आॅक्टोबर रोजी होत आहेत. यापैकी ४ ग्राम पंचायतीच्या निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १६ आॅक्टोबर रोजी होत आहेत. यापैकी ४ ग्राम पंचायतीच्या निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे आता केवळ ३४२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे.
येत्या १६ आॅक्टोबरला जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होवू घातली आहे. १६ तारखेला मतदान तर १७ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासन कामाला लागला आहे. जिल्ह्यातील चार गावात सरपंच आणि सदस्यांची निवड गावकºयांनी बिनविरोध केली. तर सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
त्यामुळे ३४७ पैकी आता ३४२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार असल्याने उमेदवारांमध्ये चांगली चूरस पाहयला मिळत आहे.
निवडणुकीत शासनाचा खर्च होऊ नये यासाठी चार ग्रामपंचायतीने अविरोध निवडणूक करण्यास पुढाकार घेतला. त्यात तिरोडा तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत सरपंचासह आठ सदस्य असलेली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी दर्रे ही ग्रामपंचायत सरपंचासह आठ सदस्य असलेली असून या ही ग्रामपंचायतीने अविरोध निवड केली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव या ग्रामपंचायतीची १० सदस्य संख्या असून या ही ग्रामपंचायतीने अविरोध निवडणुक झाली आहे.
तसेच देवरी तालुक्याच्या मगरडोह येथील सरपंचासह आठ सदस्य संख्या असलेल्या या नक्षलग्रस्त भागातील ग्रामपंचायतीने अविरोध निवडणुक करुन शासनाचा खर्चाची बचत केली आहे. आमगाव खुर्द नगर परिषद व्हावी या मुद्दाला घेऊन येथील गावकºयांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतीची निवडणुक सोमवार (दि.१६) होत आहे.