१५ व्या वित्त आयोगात वीज बिल भरणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:21+5:302021-07-03T04:19:21+5:30
गोरेगाव : शहरातील जगत महाविद्यालयात गुरुवारी (दि.१) सरपंच सेवा महासंघाच्यावतीने जिल्हास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील ...
गोरेगाव : शहरातील जगत महाविद्यालयात गुरुवारी (दि.१) सरपंच सेवा महासंघाच्यावतीने जिल्हास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच यांनी हजेरी लावली होती. या सभेत ग्रामपंचायत थकीत विद्युत पथदिव्यांचे वीजबिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून न भरण्याचा ठराव एकमताने पारीत केला.
बैठकीला सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शशेंद्र भगत, जिल्हा अध्यक्ष कमल येरणे, महिला अध्यक्ष मधु अग्रवाल, राजेश पटले , मुनेश रहांगडाले, सुनील ब्राम्हणकर, दिनेश कोरे, नीलेश खोब्रागडे, संजू कटरे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोमेश रहांगडाले, सचिव तेजेद्र हरिणखेडे, अल्का पारधी, विनोद पारधी चद्रशेखर बोपचे उपस्थित होते. सभेत ग्रामपंचायतच्या पथदिव्यांचे विद्युत बिल १५ व्या वित्त आयोगातून भरणार नाही, असा निर्णय सर्वांनी घेतला. जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांना विमा कवच, मग्रारोहयोच्या कामात राॅयल्टीची सूट देण्यात यावी. वर्गखोली बांधकामाची प्रशासकीय मान्यता त्वरित देण्यात यावी, १५ व्या वित्त आयोगाचा वार्षिक आराखडा त्वरित मंजुरी देऊन काम सुरू करण्यास प्रशासनाने मदत करावी, जनसुविधा नागरी सुविधा या कामांना त्वरित मंजुरी प्रदान करण्यात यावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.