येरंडी परिसरात विजेचा लपंडाव सुरूच
By admin | Published: June 21, 2017 01:07 AM2017-06-21T01:07:22+5:302017-06-21T01:07:22+5:30
परिसरासह येरंडी गावात दिवसातून कित्येकदा वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार सुरूच आहे.
नागरिकांना त्रास : दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : परिसरासह येरंडी गावात दिवसातून कित्येकदा वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार सुरूच आहे. विजेच्या या लपंडावामुळे मात्र परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी नागरीक करीत आहेत.
वीजेचा हा लपंडाव उन्हाळयातही असाच सुरू होता. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा अशाच परिस्थितीत नागरिकांनी काढला. या प्रकराची भ्रमणध्वनीवरुन तक्रार सुध्दा करण्यात आली. पण वीज कंपनीचे अभियंता नेहमी काम सुरू असल्याचे सांगत असतात. परंतु काम पूर्णपणे होतच नाही का? असा सवाल गावकरी करतात.
दिवसभरात कमीत-कमी १०-१५ वेळा वीज जाते. या परिसरातील सर्वच क्षेत्रात पदाधिकारी नेमले आहेत. पण ते फक्त खुर्चीसाठीच का? समस्या सोडवायला कुणाला नेमले आहे हे कळेना. अशाच वातावरणामुळे अशा समस्यांचे प्रमाण वाढत आहेत.
या परिसराच्या समस्या सुटतील असे वाटत नाही. कोण वाली गरीबाचा? अशा प्रतिक्रीय नागरिक व्यक्त करतात. येरंडी परिसरातील विजेचा लपंडाव कायमचा बंद व्हावा. यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे व नागरिकांचा त्रास कमी करावा तसेच विज विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, बोळदे, कवठावासी करत आहेत.