इलेक्ट्रॉनिक काट्यांना दिली बगल

By admin | Published: November 23, 2015 01:31 AM2015-11-23T01:31:25+5:302015-11-23T01:31:25+5:30

धान मोजणीत काटा मारून शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी पणन महामंडळाच्या आदेशावरून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची खरेदी केली.

The electronic chains are rounded | इलेक्ट्रॉनिक काट्यांना दिली बगल

इलेक्ट्रॉनिक काट्यांना दिली बगल

Next

प्रशासनाची भूमिका संशयास्पद : साधारण काट्यांनीची होत आहे मोजणी
कपिल केकत गोंदिया
धान मोजणीत काटा मारून शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी पणन महामंडळाच्या आदेशावरून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची खरेदी केली. मात्र मागील वर्षी काटे खरेदी केल्यानंतरही त्यांना बगल देत आजही साधारण काट्यांवरच बाजार समितीत मोजणीचा प्रकार सुरू आहे. बाजार समिती प्रशासनाकडून याबाबत व्यापाऱ्यांकडून टोलवाटोलवी होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. यात मात्र बाजार प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद दिसून येत आहे.
उन्ह-पावसात घाम गाळून पिक काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा. तसेच धानाच्या मोजणीत काटा मारून त्यांची लूट होऊ नये याची खबरदारी घेत असलेल्या पणन महामंडळाने इलेक्ट्रीक काट्याने धानाची मोजणी करण्याचे निर्देश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले होते. महामंडळाच्या या आदेशाचे पालन करीत येथील बाजार समितीने २५ इलेक्ट्रॉनिक काटे खरेदी केले आहे. मागील डिसेंबर महिन्यात हे २५ इलेक्ट्रॉनिक वजन काटे सुमारे २.७५ लाख रूपयांत खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.
आता हे काटे खरेदी करून जवळपास वर्ष होत आहे. मात्र खरेदी करण्यात आलेले हे काटे आजही बाजार समितीतील एका खोलीत कुलूपबंद पडून असावेत. पणन महामंडळाच्या आदेशावरून या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची खरेदी करून बाजार समिती प्रशासनाने किती कर्तव्यदक्षतेने समितीचा कारभार सुरू आहे हे दाखवून दिले. मात्र काटे खरेदी केल्यानंतर त्यांचा वापर करण्यात प्रशासन फेल ठरत आहे. हेच कारण आहे की, वर्ष लोटत आले असले तरिही या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांना बगल देत साधारण काट्यांवरच बाजार समितीतील मोजणीचा कारभार सुरू आहे.
आज सर्वत्र नवनवीन यंत्राचा वापर केला जात आहे. जुन्या यंत्रांचा वापर सोडून नवीन तंत्रज्ञान अवलंबिले जात आहे. दुसरीकडे मात्र येथील कृषी उत्पन्न्न बाजार समितीत जुन्या साहीत्यांचा वापर होत असून नवीन तंत्रज्ञानाला बगल दिली जात असल्याने हा प्रकार संशयास्पद दिसून येतो. बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना पत्र देऊन इलेक्ट्रॉनिक काट्यांनी मोजणी करण्याबाबत सूचविण्यात आले असल्याचे सांगीतले जात आहे. दिवाळी पूर्वी पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना या संदर्भात पत्र देण्यात आल्याचे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुरेश जोशी यांनी सांगीतले. मात्र हमाल ट्रेंड नसल्याने व्यापारी याचा विरोध करीत असल्याचेही जोशी यांनी सांगितले. येथे प्रशासनाकडून इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची सक्ती केली जाऊ शकते. मात्र मागील वर्ष भरापासून बाजार समिती प्रशासन इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर सुरू करण्यात कसली वाट बघत आहे हे सांगणे मात्र कठिण आहे.

बाजार समितीत ३० जुने काटे

आजघडीला बाजार समितीत ३० जुने काटे लागले असून व्यापारी त्यावरच मोजणी करीत आहेत. या काट्यांची वजन माप विभागाकडून तपासणी केली जाते. मात्र पणन महामंडळाने मोजणीत पारदर्शकता यावी म्हणून इलेक्ट्रॉनिक काटे खरेदी करण्यास सांगत त्यांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र येथील बाजार समितीत आजही या ३० जुन्या काट्यांचाच वापर सुरू आहे. आता त्यांना बदलण्याची गरज आहे.

Web Title: The electronic chains are rounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.