दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार
By admin | Published: October 5, 2015 02:06 AM2015-10-05T02:06:59+5:302015-10-05T02:06:59+5:30
गांधी जयंतीनिमित्त सानगडी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. गावातील वैध तसेच अवैध दारुचे दुकान बंद करण्याकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात येणार होता.
सानगडीतील प्रकार : शासनाच्या आदेशाला केराची टोपली, पण ग्रामसभा नाही
पुरूषोत्तम डोमळे सानगडी
गांधी जयंतीनिमित्त सानगडी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. गावातील वैध तसेच अवैध दारुचे दुकान बंद करण्याकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात येणार होता. मात्र ग्रामविस्तार अधिकारी यांनी ग्रामसभेला दांडी मारल्याने विशेष ग्रामसभा होऊ शकली नाही. दोन दिवसांपूर्वीच दारुबंदीसाठी शेकडो महिलांनी कंबर कसून ग्रामसभेवर धडक दिली होती, हे विशेष.
गणराज्य दिन, स्वातंत्र्य दिन व गांधी जयंती निमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन गांव विकासाचे निर्णय द्यावे असा शासनाचा नियम आहे. मात्र ग्राम सभा न झाल्याने शंका कुशंकाना ऊत आला आहे.
अवैध व वैध दारु विक्रेत्यांनी संगनमत करुन ग्रामसभा होवू दिली नाही, अशी सानगडीवासियांत चर्चा आहे.
आदर्श गांव घडविण्याकरिता सरपंच- सचिव तसेच ग्रामपंचायत सरपंचा सह सदस्यांनी प्रेरीत करने आवश्यक आहे. मात्र सानगडीत उलट परिस्थीती पाहावयास मिळाली. ग्रामविस्तार अधिकारीच सभेला उपस्थित न राहिल्याने सभा तहकूब करण्यात आली.
सरपंचानी ठरलेल्या विषयावर चर्चा न करता नाही. राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी २ आॅक्टोंबरला विशेष ग्रामसभा घेवून सुंदर व स्वच्छ गावाचे स्वप्न साकारण्याचे आवाहन केले. बरगळेली ग्रामसभा १० आॅक्टोबरला ठेवण्यात आली आहे. दारुबंदीसाठी एल्गार पुकारलेल्या महिलांनी हिंमत न हारता होणाऱ्या ग्रामसभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दारुबंदीचा ठराव पारित करावा. आमिषाला बळी न पडता गावातील सुज्ञ नागरिकांनी महिलांना पाठिंबा द्यावा अशी जनसामान्यात चर्चा आहे.
तंटामुक्ती गाव समिति, गणेश मंडळ, दुर्गा देवी मंडळांनी सुध्दा तसेच भागवत सप्ताह आयोजकांनी सुध्दा गावाच्या विकासाकडे लक्ष देवून दारुबंदीसाठी एल्गार पुकारलेल्या महिलांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.