कचारगड यात्रेसाठी कमाला लागली यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:16 PM2019-01-20T22:16:52+5:302019-01-20T22:17:52+5:30

१७ फेबु्रवारी पासून सुरु होत असून यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच सतत १० दिवस भाविकांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या सुरक्षीत यात्रेसाठी कोणती दक्षता घेतली जावी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आमदार परिणय फुके यांच्या अध्यक्षतेत व आमदार संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत धनेगाव येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.

Emergency system for Kachargad yatra | कचारगड यात्रेसाठी कमाला लागली यंत्रणा

कचारगड यात्रेसाठी कमाला लागली यंत्रणा

Next
ठळक मुद्देधनेगाव येथे आढावा बैठक : आमदार फुके व पुराम यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : १७ फेबु्रवारी पासून सुरु होत असून यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच सतत १० दिवस भाविकांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या सुरक्षीत यात्रेसाठी कोणती दक्षता घेतली जावी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आमदार परिणय फुके यांच्या अध्यक्षतेत व आमदार संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत धनेगाव येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.ए.राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, पं.स.सभापती अर्चना राऊत, विरेंद्र अंजनकर, शंकर मडावी, विनोद अग्रवाल व वरिष्ठ पदाधिकारी आणि जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तत्पुर्वी सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी धनेगाव ते कचारगड पर्यंत पायी चालत जत्रा स्थळापासून कचारगड देवस्थानापर्यंत निरीक्षण करून कोणत्या ठिकाणी काय काय व्यवस्था केली जावी याची पाहणी केली.
सालेकसा तालुक्यात छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या कचारगडला आदिवासी समाजाचे उगमस्थळ मानले जात असून या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज श्रद्धेने येवून नमन करुन जातो. आद्य पोर्णिमेनिमित्त आपल्या पूर्वजाला नवस फेडण्यासाठी दरवर्षी येथे सुमारे पाच ते सहा लाख भाविक येत असतात. त्या लाखो भाविकांना पुरेशा सोयी सुविधा पुरविणे एक मोठे आवाहन असते. अशात स्थानिक कचारगड देवस्थान समितीसोबत प्रशासन व शासन स्तरावर हातभार मिळणे गरजेचे असते. यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.
कचारगड येथे आशिया खंडाची सर्वात मोठी गुफा असून या ठिकाणी आदिवासी क्षेत्रात असलेल्या या निसर्गरम्य परिसरावर आदिवासींची मोठी श्रद्धा असल्याबरोबरच प्राकृतीक पर्यटन स्थळाच्या रुपात सुद्धा हे स्थळ इतर पर्यटकांना सुद्धा आकर्षित करीत असते. अशात कचारगड यात्रेला व्यापक प्रतिसाद मिळत असते. आ परिस्थितीत चाक चौबंद सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, सुकूर रस्ते, प्रवास साधन, निवास व्यवस्था, स्नानगृह, शौचालय अशा मुलभूत सोयी कशा प्रकारे पुरविण्यात येतील याबाबत सविस्तर चर्चा करुन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आले. पारी कोपार लिंगो मा काली कंकाली कचारगड देवस्थान समितीला पुरेपूर सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Emergency system for Kachargad yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.