कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:11+5:302021-05-15T04:28:11+5:30
गोंदिया : जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता जबाबदारीने कामे करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर ...
गोंदिया : जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता जबाबदारीने कामे करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड-१९ संदर्भात जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन कापसे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, अन्न व औषध प्रशासनाधिकारी संदीप नरवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन चाचण्यांवर भर देण्यात यावा. कोरोनाबाधित रुग्णांबाबत यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे. शासकीय व खासगी रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिविर, रुग्णवाहिका, रुग्णालयातील औषधसाठा व मनुष्यबळ तसेच प्लाझ्माविषयी काय परिस्थिती आहे, याबाबत नियोजन करण्यास सांगितले.