ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची बेबंदशाही

By admin | Published: August 18, 2014 11:35 PM2014-08-18T23:35:20+5:302014-08-18T23:35:20+5:30

येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या बेबंदशाहीने परिसरातील रुग्णांची फारच गैरसोय होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने मुजोर कर्मचाऱ्यांना वेळीच

Employee Embezzlement in Rural Hospital | ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची बेबंदशाही

ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची बेबंदशाही

Next

नवेगावबांध : येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या बेबंदशाहीने परिसरातील रुग्णांची फारच गैरसोय होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने मुजोर कर्मचाऱ्यांना वेळीच पायबंद घालावा अन्यथा रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
एकेकाळी नवेगाव ग्रामीण रुग्णालयाचे नाव परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या आदराने घेतले जात असे. दवाखाण्याचा दर्जा व रुग्णांना दिली जाणारी सेवा यामध्ये तडजोड केली जात नसे. डॉ. विकास मेश्राम, डॉ. खोब्रागडे, डॉ.जे.आर. शेंडे यांचे नाव अनेक वर्षानंतरही परिसरातील जनता विसरलेली नाही. परंतु मागील काही वर्षापासून या रुग्णालयाच्या किर्तीला उतरती कळा आणण्याचे काम येथील काही डॉक्टर व कर्मचारी करीत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. यादरम्यान आ. राजकुमार बडोले यांनी रुग्णालयाला भेट दिली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व सहायक अधीक्षक यांच्या बेजबाबदारपणामुळे अधिनस्थ कर्मचाऱ्यांची बेबंदशाही अधिकच वाढल्याचे दिसून आले. एका कर्मचाऱ्याने तर उपस्थित नसतानाही आगाऊ सह्या हजेरी रजिस्टरवर करुन ठेवण्याची दबंगगिरी केली.
या रुग्णालयात एकूण सात परिचारिकांची पदे मंजूर असून त्यापैकी पाच पदे भरलेली आहेत. त्यापैकी दोन परिचारिका अर्ज न देता किंवा रजा मंजूर न करताच मागील एक महिन्यापासून गैरहजर आहेत. त्यांच्यावर प्रशासनाच्यावतीने कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्वांच्या कामाचा भार मात्र फक्त तीनच परिचारिका पाहत आहेत. वरिष्ठांशी जवळीक साधणाऱ्यांना सुट दिल्या जाते असा आरोपही करण्यात आला.
संपुर्ण दवाखाण्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एवढेच नव्हे तर सफाई कामगार अनुपस्थित असल्याकारणाने महिला वार्डातील शौचालयात पाणी देखील टाकण्यात आले नाही. मागील आठ दिवसांपासून घाणीचे साम्राज्य असल्यामुळे अनेक रुग्ण वार्डात न थांबता बाहेर पटांगणात थांबने पसंत करीत असल्याचे देखील सांगण्यात येते.
ब्लड टेक्निशियन पटले हे चार दिवसांपासून हजर नसून कार्यालयात त्यांचा अर्ज उपलब्ध नव्हता. तसेच हजेरी पटावर त्यांच्या नावासमोर कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. बाळंतपणासाठी आलेल्या महिला रुग्णांना गंभीर प्रसंगी गोंदियाला हलवावे लागते. अशा रुग्णांना डिझेलचे कारण सांगून शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या जात नाही. वास्तविक पाहता गरोदर महिलांना नि:शुल्क रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यायला पाहिजे. रुग्णालयातील अनेक कर्मचारी बाहेरगावाहून जाणे-येणे करतात. परंतु खोटे प्रमाणपत्र सादर करुन ते घरभाडे भत्ता व नक्षल भत्ताची उचल करतात.
गरिब जनतेला आरोग्य सेवेपासून वंचीत ठेवण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करीत असल्याचा आरोप उपस्थित रुग्णांनी केला. अशा माजोऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी व जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यात यावी अथवा तालाठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ.बडोले यांनी दिला.
याप्रसंगी खंडविकास अधिकारी कोरडे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर मरसकोल्हे, पंचायत समिती सदस्य किशोर तरोणे, माजी सरपंच रघुनाथ लांजेवार, विजय डोये, बाबुलाल नेवारे, बावणकर आदी पदाधिकारी देखील होते. याबाबत आरोग्य प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)

Web Title: Employee Embezzlement in Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.