जुन्या पेंशनच्या मागणीसाठी कर्मचारी एकसंघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:40 PM2019-09-09T23:40:16+5:302019-09-09T23:40:58+5:30
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, वेतनत्रृटी दूर कराव्यात,अनुकंपाची भरती करावी, विविध खात्यातील कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाची उपासमार थांबवून त्यांना त्यांच्या हक्काचे कुटुंब निवृत्तीवेतन त्वरीत देण्यात यावे आदी मागण्याबाबत शासन उदासीन असून वेळकाढू धोरण अवलंबवित असल्याने सर्वच शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन २००५ नंतर शासकीत सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक,शिक्षकेत्तर समन्वय समिती गोंदियाच्या नेतृत्त्वात सोमवारी (दि.९) जिल्हास्तरावर आणि प्रत्येक तालुक्यात संप पुकारण्यात आला. जुन्या पेशंनच्या मागणीसाठी जिल्हाभरातील पाच हजारावर कर्मचारी एकसंघ झाले होते. कर्मचाºयांनी येथील जि.प.समोर निदर्शने केली.
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, वेतनत्रृटी दूर कराव्यात,अनुकंपाची भरती करावी, विविध खात्यातील कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाची उपासमार थांबवून त्यांना त्यांच्या हक्काचे कुटुंब निवृत्तीवेतन त्वरीत देण्यात यावे आदी मागण्याबाबत शासन उदासीन असून वेळकाढू धोरण अवलंबवित असल्याने सर्वच शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.
१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाºयांना हक्काच्या वेतन कपातीवर आधारित अंशदायी पेंशन योजना शासनाने लागू केली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रातील शेकडो मृत कर्मचाºयांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकाराप्रमाणे त्यांना हक्काचे कुटुंब निवृत्तीवेतन लागू करण्याची मागणी केली. आंदोलने करुन व मागण्याबाबत चर्चा करुनही शासनाने या मागण्या अद्यापही मार्गी लावल्या नाहीत. त्यामुळे सर्वच कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष आहे. कर्मचाºयांच्या वेतनामध्ये त्रृटी आहेत. शासन सर्वच क्षेत्रात खाजगीकरणाचे धोरण अवलंबित असून कंत्राटीकरण सुरु करीत आहे. कर्मचारी भरती व अनुकंपा भरती रखडली आहे.२५ आॅगस्ट रोजी सर्व कर्मचारी संघटना पुणे येथे एकत्र आल्या.यापुढे कर्मचारी हक्कासाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम करणे, ९ सप्टेंबर रोजी एक दिवसीय संप आणि मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी सर्व कार्यालये, शाळा, महाविद्यालय बंद होती. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ११ सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आंदोलनात शिक्षक संघाचे अध्यक्ष विरेंद्र कटरे, सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, एस.यू.वंजारी, डी.टी.कावळे, केदार गोटेफोडे, एल.यु.खोब्रागडे, शिक्षक परिषदेचे कार्यवाह गुनीला फुंडे, जुनी पेंशन हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष राज कडव, प्रसिध्दी प्रमुख संदीप सोमवंशी,सचिन राठोड, मुकेश राठोड, रवी अंबुले, शालीक कठाणे, चंद्रकुमार कोसरकर, क्रिष्णा कापसे, संजय उके,मोहन बिसेन,ओमप्रकाश वासनिक, चंदू दुर्गे, लिकेश हिरापुरे, भूषण लोहारे, प्रितम लाडे, सुनील चौरागडे, अजय कोटेवार, प्रदीप गणवीर, यशोधरा सोनवाने,जयश्री सिरसाटे, प्राजक्ता रणदिवे, सरीता भरणे, स्रेहल ब्राम्हणकर, आरती सतदेवे, संगीता गायधने, वंदना वहाणे, कल्पना बनकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.