विकास कामातून निर्माण होणार रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:34 PM2017-08-23T23:34:18+5:302017-08-23T23:34:38+5:30

विविध भागाचा विकास करण्यासाठी आणि शासनाकडून विकास कामे खेचून आणण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे दूरदृष्टी असावी लागते.

Employment opportunities will be created from the development work | विकास कामातून निर्माण होणार रोजगाराच्या संधी

विकास कामातून निर्माण होणार रोजगाराच्या संधी

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विविध भागाचा विकास करण्यासाठी आणि शासनाकडून विकास कामे खेचून आणण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे दूरदृष्टी असावी लागते. ती असल्यास नक्कीच विकासाला गती मिळते. याच विकास कामातून रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.
स्थानिक विकास आमदार निधीतून मंजूर रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते लोधीटोला येथे बोलत होते. या वेळी प.स.उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प.सदस्य सिमा मडावी, माजी जि.प.सदस्य मुनेंद्र नांदगाये, प.स.सदस्य प्रिया मेश्राम, माजी सभापती स्रेहा गौतम, डॉ.सुनील कटरे, प.स.सदस्य योगराज उपराडे, सरपंच संजय ठाकरे, उपसरपंच पगरवार, गजानंद कावळे, योगराज अटरे, विनोद ठाकरे, विश्राम अटरे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, या परिसराच्या विकासासाठी मी सदैव कठिबध्द आहे. मुर्री येथे नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळेची स्थापना, मुर्री ते चुटिया-पांगडी या रस्त्याचे काम आणि पांगडीला पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करण्याचा मानस आहे. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांनी आ.अग्रवाल यांच्यामुळे परिसरातील अनेक समस्या मार्गी लागल्या. ते सदैव जनतेशी कनेक्ट राहणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे पुलाची समस्या मार्गी लागल्याचे सांगितले. या वेळी १० लाख रुपये खर्चून मुर्री-पांगडी, लोधीटोला रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Web Title: Employment opportunities will be created from the development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.