शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील रिक्त पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:03 AM2017-12-21T00:03:17+5:302017-12-21T00:04:59+5:30
येथील शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात प्राचार्यासह प्राध्यापकांची पदे त्वरित भरण्याचे निर्देश आ. गोपालदास अग्रवाल तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव दहीफडे व सहसंचालक गुलाब ठाकरे यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात प्राचार्यासह प्राध्यापकांची पदे त्वरित भरण्याचे निर्देश आ. गोपालदास अग्रवाल तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव दहीफडे व सहसंचालक गुलाब ठाकरे यांना दिले.त्यामुळे रिक्त पदे भरण्याची समस्या मार्गी लागणार आहे.
शासकीय शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात मागील वर्षभरापासून प्राचार्य व प्राध्यापकांची पदे रिक्त होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. रिक्त पदे भरण्याकरिता वांरवार पाठपुरावा करुन सुध्दा तंत्रशिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. आ.अग्रवाल यांनी याची गांर्भियाने दखल घेत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान तंत्रशिक्षण शिक्षण विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली.
रिक्त पदे भरण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रिक्त पदे त्वरीत भरण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आ. अग्रवाल यांनी या वेळी सहसचिव दहीफडे यांना तंत्रनिकेत विद्यालयात उर्वरित बांधकामासाठी शासनाने ३ कोटी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला बांधकाम करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात विद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सहसचिव दहीफडे यांनी विद्यालयातील रिक्त असलेली पदे योग्यतेनुसार लवकरच भरण्याचे आश्वासन दिले.
त्यामुळे मागील अनेक दिवसांपासूनची प्रलबिंत समस्या मार्गी लागणार असून दोन नवीन अभ्यासक्रम सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.