धूम्रपानबंदी कायदा धाब्यावर

By admin | Published: May 8, 2017 12:57 AM2017-05-08T00:57:45+5:302017-05-08T00:57:45+5:30

तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी

Enactment of the Enforcement Act | धूम्रपानबंदी कायदा धाब्यावर

धूम्रपानबंदी कायदा धाब्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाला सात वर्षाचा काळ पूर्ण झाला. तरीही या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशित करण्यात आले. परंतु सात वर्षाचा कालावधी संपून या काळात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच आहे. हा कायदा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते. गोंदिया बसस्थानकावर अनेकजण खुलेआमपणे बिडी, सिगारेट पिताना दिसतात. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे यामुळे या परिसरात नियमित व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या आरोग्याला धूम्रपानाचे नाहक दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणेने या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कायद्यानुसार १८ वर्षाच्या खालील मुलाने तंबाखू किंवा तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई आहे. परंतु पानटपरीवर बसून लहान मुले सर्रास तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे अशा दुकानातून त्या मुलांचे समवयस्क मुले त्यांच्याकडून तंबाखुजन्य पदार्थ सहज मिळवितात. प्राथमिक शाळात शिकणाऱ्या लहान मुलामुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अन्न व प्रशासन विभागाने परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शाळकरी मुले-मुली, कामकरी महिला यांच्यासह नोकरशाहीतील कर्मचारी, शिक्षकांसह अनेकजण सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत असल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यात खर्रा या तंबाखुजन्य पदार्थाचे सेवनामुळे अनेकांना तोंडाचे आजारसुद्धा बळावत असल्याचे निदर्शनास येत आहे.

Web Title: Enactment of the Enforcement Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.