नगर परिषद हटविणार अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:38 PM2018-10-29T21:38:39+5:302018-10-29T21:39:04+5:30
दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठेत वाढणारी गर्दी बघता वाहनांच्या पार्कींगसाठी जागा उपलब्ध व्हावी. यासाठी नगर परिषदेकडून मंगळवारी (दि.३०) अतिक्रमण हटाओ मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्र पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठेत वाढणारी गर्दी बघता वाहनांच्या पार्कींगसाठी जागा उपलब्ध व्हावी. यासाठी नगर परिषदेकडून मंगळवारी (दि.३०) अतिक्रमण हटाओ मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्र पाठविले आहे. गोंदिया शहर जिल्हास्थळ असून शहरासह ग्रामीण भागातील जनता दिवाळीच्या खरेदीसाठी आता बाजारापेठेत खरेदीसाठी येत आहे.
परिणामी त्यांच्या वाहनांच्या पार्कींगची सोय होत नसून वाहतूक विस्कळत आहे. यावर तोडगा काढता यावा. यासाठी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांना पत्र पाठवून बाजारातील रस्त्यांवर करण्यात आलेले तात्पुरते अतिक्रमण हटविण्यास सांगीतले आहे. हे अतिक्रमण हटविल्यास मोकळ््या होणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या पार्कींगची सोय करता येणार आहे.
पोलीस अधीक्षक बैजल यांच्या पत्रानुसार नगर परिषद मंगळवारी (दि.३०) शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम राबविणार आहे. यात नगर परिषदेकडून मंगळवारी गांधी प्रतिमा ते चांदनी चौक, जुनी बाजार समिती रस्ता, जैन कुशल भवन रस्ता होत मोदी पेट्रोल पंप होत सर्कस मैदान रस्त्यावरील अतिक्रमण काढणार आहे.
या रस्त्यांवरील अतिक्रमण काढून तेथे वाहनांच्या पार्कींगची सोय केली जाणार आहे.
अतिक्रमधारकांच्या माहितीस्तव मुनादी सुरू
नगर परिषदेकडून काढण्यात येणाºया या मार्गांवरील अतिक्रमण धारकांच्या माहितीस्तव नगर परिषदेने मागील दोन-तीन दिवसांपासून मुनादी सुरू केली आहे. नगर परिषदेने ऐनवेळी मोहिम सुरू केल्यास या दुकानदारांची धावपळ होवू नये यासाठी नगर परिषद त्यांना अगोदरच सूचित करीत आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना
पोलीस अधीक्षक बैजल यांनी आपल्या पत्रातून मोठ्या उड्डाणपुलाखालील पानठेले व टपºयांचे तात्पुरते अतिक्रमण हटविणे, सुभाष शाळेच्या मैदानाचे प्रवेशद्वार मोठे करावे तसेच नगर परिषद कार्यालयासमोरील पानठेले व भाजपाल्याची दुकाने हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे अतिक्रमण तात्पुरते हटविल्यास येथे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्कींगची सोय करता येईल हा या मागील हेतूै आहे.