स्मशानभूमीतील अतिक्रमण भुईसपाट
By admin | Published: June 27, 2017 01:05 AM2017-06-27T01:05:25+5:302017-06-27T01:05:25+5:30
शासकीय जागेवर अतिक्रमण करुन पक्के घर बांधणाऱ्यांचे स्वप्न मात्र तालुक्याचे तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांच्या गतीशील कार्यवाहीने धुळीत मिळत आहे.
तहसीलदारांची कारवाई : विटासिमेंटचे पक्के घर पाडले
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : शासकीय जागेवर अतिक्रमण करुन पक्के घर बांधणाऱ्यांचे स्वप्न मात्र तालुक्याचे तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांच्या गतीशील कार्यवाहीने धुळीत मिळत आहे. नवेगावबांध येथील श्मशानभूमीत अतिक्रमण करुन बांधलले घर त्यांनी भुईसपाट केले आहे.
नवेगावबांध येथील अंतिम संस्कार करण्याच्या मरघट (गट नं. १०७) या शासकीय जागेत गावकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. गावातील अंजना शहारे यांनी स्मशानभूमीच्या शासकीय जागेत अतिक्रमण केले होते.
संंंबंधितांची कोणतीच परवानगी न घेता त्या शासकीय जागेवर विटा, सिमेंटचे पक्के घर उभे केले. शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी वेळोवेळी अतिक्रमण धारकास सुचना देण्यात आली.
ारी सुद्धा कोणतीही दखल न घेतल्याने तहसीलदार बोंबार्डे यांनी आपल्या लवाजम्यासह स्मशानभूमित बांधलेले घर जेसीपीच्या सहाय्याने पाडून अतिक्रमण भुईसपाट केले. अतिक्रमण पाडण्याच्या कारवाईने अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली.
शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण भुईसपाट करण्याच्या तहसीलदार बोंबार्डे यांच्या कारवाईचे तालुक्यात समर्थन केले जात असून शासकीय जागा बळकाविणाऱ्यांवर असाच बडगा उभारण्यात यावा अशी मागणी जोर धरीत आहे.