वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:46 AM2018-10-11T00:46:45+5:302018-10-11T00:48:06+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरातील मालीजुंगा, धानोरी बिट क्रमांक २ मधील उत्तर दिशेला रस्त्यापासून ४०० मीटरवर पहाडीला लागून राखीव जंगल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरातील मालीजुंगा, धानोरी बिट क्रमांक २ मधील उत्तर दिशेला रस्त्यापासून ४०० मीटरवर पहाडीला लागून राखीव जंगल आहे. या राखीव जंगलातून मागील दोन तीन महिन्यापासून जेसीपी लावून मोठ मोठे वृक्ष तोडून अतिक्रमण केले जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले.
शासन एकीकडे १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्ष संवर्धन करीत आहे. तर दुसरीकडे वनविभागाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट होत आहे. राखीव वनातील सुरक्षीत व झुडपी जंगलातील जागेवर अतिक्रमण करुन सर्रापणे वृक्षतोड केली जात आहे. पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरात हा प्रकार मागील काहीे दिवसांपासून सुरू आहे. वन विभागाचे अधिकारी अतिक्रमणधारकांकडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर पुन्हा अतिक्रमण करणार नाही असे लिहून घेत आहे. मात्र त्यांच्यावर कारवाही करण्यास टाळत आहे.
त्यामुळे अतिक्रमणधारकांची हिम्मत वाढत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे.