अतिक्रमण पट्टेधारक शेतकरी धानाच्या चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:56 AM2021-02-28T04:56:17+5:302021-02-28T04:56:17+5:30
शेतकरी धानाचे चुकारे मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे. आदिवासी विकास महामंडळाने वनजमीन अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना धानाचे चुकारे त्वरित देण्याची मागणी ...
शेतकरी धानाचे चुकारे मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे. आदिवासी विकास महामंडळाने वनजमीन अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना धानाचे चुकारे त्वरित देण्याची मागणी विनोद पाटील गहाणे, दिनेश पाटील रहांगडाले यांनी केली आहे. केशोरी परिसरातील वनजमीन अतिक्रमण पट्टेधारक शेतकऱ्यांची यावर्षीच्या खरीप हंगामातील धान शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या केशोरी, इळदा, गोठणगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावरुन खरेदी केले. याला आता तीन महिन्याचा कालावधी लोटला परंतु चुकारे मिळाले नाही. वनजमीन अतिक्रमण पट्टेधारक शेतकऱ्यांच्या नावे शासकीय पोर्टलवरुन सातबारा निघत नसल्याने आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यास नकारघंटा होती. परंतु खा. प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने आदिवासी विकास महामंडळाने उशीरा का? होईना केशोरी, इळदा, गोठणगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्राना धान खरेदीचे आदेश दिले. चुकारे न मिळाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. आदिवासी विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी दखल घेवून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात धानाचे चुकारे त्वरीत जमा करण्याची मागणी केली जात आहे.