अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:43 PM2017-11-24T22:43:54+5:302017-11-24T22:44:11+5:30

शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. मात्र प्रत्यक्षात मोहिमेला सुरूवात न झाल्याने त्यावरुन विविध चर्चेला उधाण आले होते.

The encroachment was removed from the campaign | अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त निघाला

अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्त निघाला

Next
ठळक मुद्देसावराटोली परिसरातून सुरूवात : अतिक्रमण काढून रस्ता केला मोकळा, पंधरा दिवस चालणार मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. मात्र प्रत्यक्षात मोहिमेला सुरूवात न झाल्याने त्यावरुन विविध चर्चेला उधाण आले होते. अखेर नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिमेला आज शुक्रवार (दि.२४) पासून सावराटोली परिसरातून सुरूवात केली. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेचा मुहूर्र्त निघाल्याची चर्चा शहरवासीयांमध्ये होती.
शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे नगर परिषदेसह शहरवासीयांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याने दर तासाला वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पाहयला मिळत होते. परिणामी वाहनचालकांना रस्त्यावरुन मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. नगर परिषदेकडूृन अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यास विलंब होत असल्याने त्यांची हिम्मत वाढली होती. वाढत्या अतिक्रमणाबाबत शहरवासीयांची ओरड वाढल्यानंतर नगर परिषदेने त्याची गांर्भियाने दखल घेतली. अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्याचे आश्वासन देत त्या दिशेने नियोजन सुरू केले.
नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी एप्रिल महिन्यात अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. मात्र तेव्हा मारहाणीचा प्रकार घडला. त्यामुळे तेव्हा ही मोहिम अर्ध्यावर थांबविली होती. शहरातील अतिक्रमण काढावेच लागणार अशी भूमिका नगराध्यक्ष इंगळे यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेला जिल्हा प्रशासनाने सुध्दा समर्थन केले. त्यानंतर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील आठवड्यापासून भूमिअभिलेख विभागाकडून शहरातील अतिक्रमणीत ठिकाणाना मार्कींग करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर नगर परिषदेने आज शुक्रवारपासून शहरातील सावराटोली मार्गावरील रस्त्याच्याकडेला असलेले अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली. रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण पाडून रस्ता मोकळा करण्यात आला. मुख्याधिकारी चंदन पाटील, प्रशासकीय अधिकारी सी.ए.राण व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The encroachment was removed from the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.