अतिक्रमणधारकांनो ‘सावधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:17 AM2017-12-02T00:17:45+5:302017-12-02T00:17:55+5:30

अतिक्रमण हटविण्यासाठी टप्प्याटप्प्याने तयारी केली जात असल्याचे आता शहरात दिसून येत आहे. यात मोजणी व मार्किंगचे काम सुरू झाले असतानाच बाजारातील मुख्य मार्गांवर मुनादी सुरू झाली आहे.

Encroachments are 'careful' | अतिक्रमणधारकांनो ‘सावधान’

अतिक्रमणधारकांनो ‘सावधान’

Next
ठळक मुद्देशहरात सुरू झाली मुनादी : अतिक्रमण मोहिमेच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अतिक्रमण हटविण्यासाठी टप्प्याटप्प्याने तयारी केली जात असल्याचे आता शहरात दिसून येत आहे. यात मोजणी व मार्किंगचे काम सुरू झाले असतानाच बाजारातील मुख्य मार्गांवर मुनादी सुरू झाली आहे. मोहिमेंतर्गत प्राधान्य देण्यात आलेल्या मुख्य मार्गांवर यासाठी एक रिक्शा फिरत आहे. यातून अतिक्रमणधारकांना सुचीत केले जात आहे.
आजघडीला अतिक्रमण हा विषय राज्यातच गाजत आहे. अवघ्या राज्यातच अतिक्रमण ही एक गंभीर समस्या निर्माण झाली असून अतिक्रमणामुळे कित्येक सहर विदु्रप झाले आहे. परिणामी तेथील नागरिकांना याचा फटका दैनंदिन जिवनात सहन करावा लागत आहे. यासाठी राज्य शासनाकडूनच अतिक्रमण हटविण्यासाठी पाठिंबा दिला जात आहे. अतिक्रमणाचा हा आजार गोंदिया शहरालाही जडला असून त्याचा त्रास शहरवासी भोगत आहेत. शिवाय शहराचे विद्रुपीकरण झाले असतानाच विकासाच्या कित्येक योजना राबविताना आता त्रास जाणवत आहे.
अतिक्रमणाचा विषय आता नेहमीप्रमाणे पुढे-पुढे ढकलण्यापेक्षा येथेच संपविण्यात यावा यासाठी जिल्हा व नगर परिषद प्रशासनाकडून पुरेपुर प्रयत्न व तयारी केली जात आहे. यांतर्गत शहरवासीयांच्या सुविधेसाठी शहरातील मुख्य मार्गांना प्राधान्य देत अतिक्रमण हटाओ मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय कुडवा नाकापासून अतिक्रमणाची मोजणी सुरू करण्यात आली आहे. अतिक्रमणाची ही मोहिम यंदा फत्ते करण्यासाठी संबंधीत सर्वच शासकीय विभाग कामाला लागले असून निवड करण्यात आलेल्या मार्गांवरील अतिक्रमणाची मोजणी करीत आहेत.
एवढेच नव्हे तर, भूमी अभिलेख विभागाकडून अतिक्रमण काढण्यासाठी निवड करण्यात आलेल्या मार्गांवरील जागेची मोजणी व मार्कींग करण्यासाठी तारखांचे नियोजनही करण्यात आले आहे. मोजणी व मार्कींगचे हे काम पूर्ण होताच मोहिम राबविली जाणार असल्याचे नियोजन नगर परिषदेने केले आहे. मात्र त्यापूर्वी या मार्गावरील अतिक्रमणधारकांच्या सुचनार्थ नगर परिषदेने आता मुनादी सुरू केली आहे. यांतर्गत एक रिक्शा बाजार भागातील निवड करण्यात आलेल्या मार्गांवर फिरत आहे.
या मुनादीतून अतिक्रमणधारकांना त्यांनी केलेले अतिक्रमण स्वत:च काढण्याचे आवाहन केले जात आहे. असे न झाल्यास मोहिम राबविण्यास सुरूवात झाली असता नगर परिषद अतिक्रमण काढणार असल्याचेही सुचीत केले जात आहे. या मुनादीमुळे मात्र अतिक्रमणधारकांत धडकी भरली असल्याचेही बोलले जात आहे.
मार्किंग झाल्यावर देणार नोटीस
शहरातील कुडवा नाका परिसरातून अतिक्रमण मोजणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. अतिक्रमण मोजणी सोबतच मार्किंग ही केली जाणार आहे. यात निवड करण्यात आलेल्या मार्गांवरील मोजणी व मार्किंग केल्यावर अतिक्रमणधारकांना नोटीस दिले जाणार आहे. नोटीस दिल्यावर अतिक्रमणधारकांना काही मुदत दिल्यानंतर मात्र अतिक्रमण काढले जाणार असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगीतले.

Web Title: Encroachments are 'careful'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.