इंजिन शेड शाळा बनली डंम्पिंग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:33 AM2018-10-31T00:33:10+5:302018-10-31T00:33:33+5:30

मोक्षधाम परिसर डंम्पींग यार्ड बनविण्यात आल्यानंतर आता शहरातील इंजिन शेड शाळेचा नंबर लागल्याचे दिसून येत आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील कचरा या शाळेतील मैदानात टाकला जात आहे.

Engine shade school became a dumping yard | इंजिन शेड शाळा बनली डंम्पिंग यार्ड

इंजिन शेड शाळा बनली डंम्पिंग यार्ड

Next
ठळक मुद्देपरिसरातील कचरा शाळेत : गांडुळ खत निर्मिती टँक झाले शोभेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मोक्षधाम परिसर डंम्पींग यार्ड बनविण्यात आल्यानंतर आता शहरातील इंजिन शेड शाळेचा नंबर लागल्याचे दिसून येत आहे.
सिव्हील लाईन्स परिसरातील कचरा या शाळेतील मैदानात टाकला जात आहे. शिवाय गांडुळ खत निर्मितीसाठी बनविण्यात आलेले टँक शोभेचे ठरत आहे. येथील कचऱ्याची उचल करण्यात यावी यासाठी नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर मंगळवारी (दि.३०) कचऱ्याची उचल करण्यात आली.
इंजिन शेड शाळेच्या मैदानात नगर परिषदेने गांडुळ खत निर्मितीसाठी टँक बनविले आहे. मात्र त्या टँकमध्ये गांडुळ खत निर्मिती केली जात नसून ते तसेच पडून आहेत. उलट घंटा गाडीवाले परिसरातील कचरा त्या टँकमध्ये आणून टाकत आहे. यामुळे परिसरातील दुर्गंध पसरत असून तेथील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
हाच विषय घेऊन मंगळवारी (दि.३०) परिसरातील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक सहारे, नगरसेवक सतीश देशमुख, माजी नगरसेवक कुंदा दोनोडे, झलकसिंह बिसेन, जयंत कछवाह, मनोहर ठाकूर, बाल्या शहारे आदि शाळेत धडकले.
यावेळी घंटागाडी चालविणारी महिला तेथे कचरा टाकत असताना दिसून आले.
नागरिकांनी नगरसेवक देशमुख यांना हे चित्र दाखवून कचºयाची उचल करण्यात सांगीतले. त्यानंतर उपस्थितांनी नगर परिषदेत संपर्क साधल्यानंतर तेथील कचºयाची उचल करण्यात आली.

Web Title: Engine shade school became a dumping yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.