यशस्वी माणसांचे विचार आत्मसात करा!
By admin | Published: January 9, 2017 01:02 AM2017-01-09T01:02:49+5:302017-01-09T01:02:49+5:30
नम्रपणा माणसाला मोठा करतो, त्यामुळे अहंपणा बाळगू नये. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा.
पालकमंत्री बडोले यांचे आवाहन : जि.प.हायस्कूलमधील कार्यक्रम
सडक-अर्जुनी : नम्रपणा माणसाला मोठा करतो, त्यामुळे अहंपणा बाळगू नये. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा. तसेच यशस्वी माणसांचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवावे असे प्रतिपादन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने आयोजीत स्नेह संमेलनाच्या समरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगर पंचायत सभापती ज्योती गिऱ्हेपूंजे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रिता लांजेवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, नगर पंचायत उपाध्यक्ष महेंद्र मसराम, सदस्य देवचंद तरोणे, गटशिक्षणाधिकारी आर.एल.मांढरे, वैशाली गिऱ्हेपूंजे, लेखराम मुनेश्वर, शाहीद पटेल, युनूस शेख, प्रा.राजकुमार भगत, जीजा पटोले, सरपंच अनिता बडोले, आर.व्ही.मेश्राम, अंकीत भेंडारकर, प्राचार्य अयाज खान, अंजूम खान उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित अन्य पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्तावीक प्राचार्य खान यांनी मांडले. संचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले. आभार डी.पी. डोंगरवार यांनी मानले.
स्नेह संमेलनासाठी आर.एस.डोये, एम.एन. भौतीक, यु.आर. तांदळे, एस.सी. फुंडे, ए.आर. कुथीरकर, वाय.के .टेंभूर्णे, डब्ल्यू.एम. परशूरामकर, वाय.वाय. कोहळे, पूजा पाटील, पी.सी. येळेकर, सी.एम. भीवगडे, एन.आर. गिरेपूंजे, यु.आय. पाखमोडे, आय.वाय. रहांगडाले, एन.जे. सावळकर, व्ही.एस. बागळकर, ए.व्ही. केंद्रे, एस.एस. ठलाल, जी.आर.निंबेकर, एस.जी. मारबते यांच्यासह शाळा मंत्रीमंडळ, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकारी सदस्यांनी तसग्ेच नागरिकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
४कार्यक्रमात एसएससी परिक्षेतील प्रथम इंद्रशेखर दूधराम डोंगरवार, द्वितीय प्रज्वल तिर्थानंद पंचभाई तसेच एचएससी परिक्षेतील प्रथम सागर मधूकर गावतुरे व किशोर निताराम मोहुर्ले यांचा नामदार बडोले यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन पुरस्कार करण्यात आला. तर सोबतच गटविकास अधिकाऱ्यांनी गुणवंतांना रोख एक हजार रूपये व अंध विद्यार्थी किशेर मोहुर्लेयाचा दोन हजार रूपये रोख देऊन सत्कार केला. शिवाय एकलव्य ज्ञानवर्धीनी सामान्य ज्ञान स्पर्धेतील प्रथम प्रतीक पंचभाई, द्वितीय श्वेता किशोर उके, तृतीय प्रगती यशवंत भेंडारकर, रोहीणी बळीराम मेश्राम व अर्शिल आरिफ खान यांचाही सत्कार करण्यात आला.