गोंडीटोला येथे शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळावा उत्साहात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:27 AM2021-02-12T04:27:21+5:302021-02-12T04:27:21+5:30

अध्यक्षस्थानी पोलीस पाटील झलक रणगिरे होते. याप्रसंगी प्रयोगशाळा तज्ज्ञ गणेश खेडीकर, कृषी पर्यवेक्षक अजाब रहांगडाले, उमेद अभियान कृषी व्यवस्थापक ...

Enthusiasm for Farmers Training and Agriculture Fair at Gonditola () | गोंडीटोला येथे शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळावा उत्साहात ()

गोंडीटोला येथे शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळावा उत्साहात ()

Next

अध्यक्षस्थानी पोलीस पाटील झलक रणगिरे होते. याप्रसंगी प्रयोगशाळा तज्ज्ञ गणेश खेडीकर, कृषी पर्यवेक्षक अजाब रहांगडाले, उमेद अभियान कृषी व्यवस्थापक गोपाल पंडेल, भूपेंद्र गाते, काशिराम रनगिरे, भैयालाल ठाकरे, मधोराव ठाकरे, राधेश्याम नागपुरे, प्रतिमा रणगिरे, सत्यभामा दमाहे, अनसूया नागपुरे उपस्थित होते. याप्रसंगी खेडीकर यांनी मृदासंवर्धनाची गरज व मृद आरोग्यपत्रिकेचे महत्त्व तसेच सद्यस्थितीत जमिनीत वाढत असलेल्या अति जास्त रासायनिक खताचा वापर थांबवून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करून आपल्या जमिनीची सुपीकता व आरोग्य कसे सांभाळता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. पंडेल यांनी जमिनीची सुपीकता, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेती आदी विषयावर मार्गदर्शन केले. गाते यांनी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी पिकांची अदलाबदल करून रासायनिक खताचा वापर कमी कसा करता येईल, याबद्दल सविस्तर माहिती दिली. कृषी सहायक रोशन लिल्हारे यांनी कृषी विभागाच्या कृषी अवजारे अनुदान, भाऊसाहेब फुंडकर योजनेचे महत्त्व, मलचिंग, प्रधानमंत्री सिंचन योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा माहिती, ड्रीप योजना अनुदान तसेच सर्व योजनांबाबत मार्गदर्शन केले. ठाकरे यांनी गांडूळ खताचे फायदे तसेच बनविण्याची कृती याबाबत सखोल माहिती दिली. याप्रसंगी जीवामृत तयार करण्याचे प्रशिक्षण स्वाती लिल्हारे यांनी प्रात्यक्षिकासह दिले. संचालन ठाकरे यांनी केले. आभार लिल्हारे यांनी मानले.

Web Title: Enthusiasm for Farmers Training and Agriculture Fair at Gonditola ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.