शिक्षक संघाचा महिला मेळावा व सहविचार सभा उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:32+5:302021-02-16T04:30:32+5:30
याप्रसंगी मंदा राऊत यांनी, समस्त शिक्षिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सक्षम असल्याचे सांगितले. आशा बांगळकर यांनी, ...
याप्रसंगी मंदा राऊत यांनी, समस्त शिक्षिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सक्षम असल्याचे सांगितले. आशा बांगळकर यांनी, शिक्षक भगिनींनी आपल्या कला गुणांना वाव देण्यासाठी कोणत्याही दबावाला न घाबरता स्वाभिमानाने संघासोबत उभे राहण्यास सांगितले. विमल उपरिकर यांनी, संघ ही लोकशाही मार्गाने चालणारी संघटना असून हिटलरशाही आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीचा निषेध करीत असल्याचे मार्गदर्शनात सांगितले. संचालन रूपाली तरोणे यांनी केले. आभार ज्ञानेश्वरी फंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भावना शेंदरे, कुमाय शहरे, ज्योती चांदेवार, बी आय अंबादे, कांचन अंबादे, योगिता मरसकोल्हे, जोत्स्ना मडावी, के. डी. येळे, एस. डब्लू. ब्राम्हणकर, टी. एन. गायधने, अशावरी बेंदवार, उषा कोसरे, पायल पशीने, वंदना शहारे, मंगला सूर्यवंशी, आय. बी. राऊत, रूपाली तरोणे, मोसमी फुलबांधे, जगदीश इरले, विजय मारवाडे, पटणे आदींनी सहकार्य केले.