सडक अर्जुनी येथे प्राथमिक शिक्षण संघाची सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:25 AM2021-02-20T05:25:08+5:302021-02-20T05:25:08+5:30
किशोर बावनकर यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पी.एम. मेश्राम, विजय डोये, योगेश्वर मुंगुलमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल ...
किशोर बावनकर यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पी.एम. मेश्राम, विजय डोये, योगेश्वर मुंगुलमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत असल्याचे सांगितले. एकस्तर पिटीसीन, मेडिकल प्रकरणे, जीपीएफचे काम, पेन्शन, मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना त्यांच्या शिक्षण विभागाच्या कामासाठी मदत, चटोपाध्याय प्रस्ताव आदीसाठी सहकार्य करीत असल्याचे सांगितले. प्राथमिक शिक्षक सोसायटीबाबत वीरेंद्र कटरे यांनी मार्गदर्शन केले. कर्ज मर्यादा २५ लाख करण्यात यावी, २ टक्के व्याज दर कमी करण्यात यावा, डीसीपीएसधारक शिक्षकांची संजीवनी सुरक्षा योजनेची रक्कम ३ लाख रुपयांवरून वाढवून ७ लाख रुपये करण्यात यावी, सोसायटीचे खाते एसबीआयमध्ये उघडण्यात यावे, आकस्मिक कर्जमर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात यावी आादी मागण्या या वेळी मांडल्या. सुरेश रहांगडाले यांनी काम कमी आणि प्रसार माध्यमातून जास्त प्रचार करणाऱ्या संघटनांवर जोरदार प्रहार केला. राहुल कोनतमवार यांनी मागील संचालक मंडळ सभासदांना सहा महिने कर्ज देत नसल्याची आठवण करून दिली. मात्र आता वीरेंद्र कटरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संचालक मंडळ सकाळी अर्ज दिल्यानंतर संध्याकाळी कर्ज मिळत असल्याचे सांगितले. चेतन उके यांनी तीन दिवसांच्या पगाराच्या नावावर स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचा स्वार्थी विरोधकांनी नाहक बळी दिल्याची टीका केली. सभेसाठी सुरेश अमले, घनश्याम मेश्राम, विलास कोटांगले, एकनाथ इरले, किशोर इरले, मोरेश्वर ब्राह्मणकर, राजू लोणारे, ओ.बी. मेश्राम, रवींद्र टेंभुर्णे, ललित फुंडे, भाष्कर शिवणकर, जी.सी. पटणे, विशाल भाजीपाले, नीलकंठ पारधी यांनी सहकार्य केले.