ग्रंथपाल दिनानिमित्त आयोजित वेबिनार उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:02+5:302021-08-15T04:30:02+5:30
गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेत ...
गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या अध्यक्षतेत हे वेबिनार घेण्यात आले. प्रमुख वक्ता म्हणून ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार नॉलेज रिसर्च सेंटरचे प्रभारी डॉ. दीपक कापडे यांनी, ग्रंथालयात आलेला वाचक हा निराश होऊन जाता कामा नये म्हणून त्यावर त्यांनी सेवेचे तीन प्रकार सांगितले. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या साईट्स विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी सांगितल्या.
या वेबिनारकरिता महाराष्ट्रातून विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. संचालन डॉ. उमेश उदापूर यांनी केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. सुनील जाधव यांनी मांडले. आभार प्रा. बबन मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमासाठी डॉ.एस.यू. खान, डॉ. सुयोग इंगळे, डॉ. योगेश बैस, प्रा. नरेश भुरे, प्रा. संतोष होटचंदानी, मनोज पटले, पवन शेंद्रे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.