उद्योजकता विकास विषयावर कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:33+5:302021-05-31T04:21:33+5:30

गोंदिया : उद्योजकता विकास केंद्र, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, रुची समूह, नाबार्ड आणि जिल्हा उद्योग ...

Enthusiastic workshop on entrepreneurship development | उद्योजकता विकास विषयावर कार्यशाळा उत्साहात

उद्योजकता विकास विषयावर कार्यशाळा उत्साहात

googlenewsNext

गोंदिया : उद्योजकता विकास केंद्र, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, रुची समूह, नाबार्ड आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकता विकास’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन २८ व २९ मे रोजी वेबिनारद्वारे करण्यात आले होते.

उद्घाटन २८ मे रोजी प्राचार्य डाॅ. अंजन नायडू यांच्या हस्ते करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून रुची समूहाचे महेंद्र ठाकूर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, जिल्हा उद्योजकता केंद्राचे व्यवस्थापक हेमंत बदार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. दिलीप चौधरी आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चव्हाण उपस्थित होते. पहिल्या सत्रात डॉ. नायडू यांनी, विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता प्रशिक्षण का आवश्यक आहे, यावर विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ. चौधरी यांनी, विद्यार्थ्यांनी उद्यमी होण्याचे स्वप्न बघावे व उद्यमी व्हावे हा संदेश दिला. ठाकूर यांनी, ‘उद्योजकतेच्या पाऊलवाटा’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी उद्यमी बनण्यासाठी त्यांचा खडतर व प्रेरणादायी जीवनप्रवास उपस्थितांसमोर ठेवला. जागरे यांनी, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या विविध उपक्रम व योजनांची माहिती करून दिली.

तर व्दितीय सत्रात, ठाकूर यांनी, हरित ऊर्जा क्षेत्रातील संधी व प्रगती या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. बदार यांनी, जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. प्रास्ताविक मांडून आभार उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक प्रा. चव्हाण यांनी मानले. तसणीम कुरेशी या विद्यार्थिनीने केले. व्याख्यानमालेत २५० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी प्रा. संजय तिमांडे, डॉ. जयंत महाखोडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Enthusiastic workshop on entrepreneurship development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.