समता सप्ताहानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:26 AM2021-04-14T04:26:45+5:302021-04-14T04:26:45+5:30
मुख्य मार्गदर्शक म्हणून पवन पाथोडे तर अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून साजन वासनिक, महेंद्र कटबरीये, ...
मुख्य मार्गदर्शक म्हणून पवन पाथोडे तर अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून साजन वासनिक, महेंद्र कटबरीये, करुणा मेश्राम, शारदा कळसकर, संदेश उके, राजरत्न मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी पाथोडे यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नसून एक विचार व एक चळवळ आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. आंबेडकरांनी शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनेक चळवळी केल्या, विधिमंडळावर मोर्चे नेले व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी दामोदर नदी प्राधिकरण स्थापन केले अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन समतादूत मुनेश रहांगडाले व मनिष बिजेवार यांनी केले होते. समता सप्ताहाचे आयोजन बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये व सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.