प्रत्येक रस्त्यावर पळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 09:30 PM2018-03-04T21:30:04+5:302018-03-04T21:30:04+5:30

Escape at every street | प्रत्येक रस्त्यावर पळस

प्रत्येक रस्त्यावर पळस

Next
ठळक मुद्देपळसाने रंगविले रस्ते : परदेशी झाडे लावण्याचा ट्रेंड बदलवा

नरेश रहिले ।
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्हा वनांचा जिल्हा म्हणून नावाजलेला असलेला असला तरी पशू-पक्ष्यांचे जीवन ज्या झाडांवर अवलंबून आहे त्या झाडांची लागवड करण्यात गोंदिया जिल्हा सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो पक्ष्यांचे जीवन फुलविणाऱ्या पळसाने निसर्गाचे सौंदर्य फुलविले. २५ वर्षापूर्वी लावलेला पळस आज घडीला गोंदिया जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्यात भर टाकत आहे. सन २०१८ च्या पावसाळ्यात गोंदिया जिल्ह्यात निसर्ग सौंदर्य फुलविणाऱ्या पळसाच्या रोपट्यांचीच प्रत्येक रस्त्यावर लागवड करण्याचा आग्रह जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा आहे. सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावरून भ्रमण केल्यास प्रत्येकक रस्त्यांवर पळसाची झाडे फुलांनी बहलेली दिसतात. ह्या निसर्ग सृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या शहरातील लोक जिल्ह्यात येतात. गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सकाळी ६ वाजता पासून सायंकाळी ६ वाजता पर्यनत तब्बल १२ तास भ्रमंती करून ४० ते ५० ठिकाणचे फोटो काढलेत. एकाच ठिकाणातून ५ ते १० फोटो काढून गोंदिया जिल्ह्यातील निसर्गाचे सौंदर्य पळस कसे फुलवितो याची पाहणी केली. हे वातावरण १५ मार्च पर्यंत असेच असेल. पण जो पळस मानवी डोळ्यांना लोभदायी रंगाचा आनंद देतो, तोच पळस इथल्या लाखो पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे जीव वाचवतो आहे. फुललेल्या एकेका पळसाच्या झाडावर शेकडोच्या संख्येने पक्षी बसलेले दिसतात. १५ ते २० माकडांची टोळी महिनाभर आरामात पळसावर गुजराण करते.
२५ वर्षात पळसाची लागवड नाही
मागील २५ वर्षात गोंदिया जिल्ह्यात नव्याने पळस लावलेला नाही. उलट पळसाची झाडे तोडून परदेशी वृक्ष लागवड झाल्याचे गोंदियात ठायीठायी दिसत आहे. सर्व निसर्गप्रेमींनी हा ट्रेंड बदलविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पळसाचे निमित्ताने ही जीवसृष्ट ीमहाराष्ट्र भरभरून वाढीला लागेल यासाठी पळसाची लागवड २०१८ च्या पावसाळ्यात लावण्याचा माणस जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा आहे.
६८४७ वृक्षांचे संरक्षण
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पुरातन वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समितीने नाविण्यपूर्ण योजनेतून सन २०१६-१७ या वर्षापासून २५० सेमी गोलाईच्या ६ हजार ८४७ वृक्षांचे संरक्षण करण्यात आले. यापैकी २ हजार ४० वृक्षांना २० लाख ४० हजार रुपये पेन्शन शेतकऱ्यांना देण्यात आली. सन २०१७-१८ या वर्षात १०० से.मी. ते १५० से.मी., १५० से.मी. २०० से.मी., २०० से.मी. ते २५० से.मी. व २५० से.मी. ते ३०० से.मी. गोलाई असलेल्या वृक्षांचे सर्वेक्षण करुन या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

Web Title: Escape at every street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.