मराठी भाषा दिनानिमित्त निबंध व वाचन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:17+5:302021-03-04T04:55:17+5:30
शेंडा-कोयलारी : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून निबंध व वाचन स्पर्धेचे आयोजन ...
शेंडा-कोयलारी : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून निबंध व वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उत्कृष्ट निबंध व वाचन स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य हरी किरणापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ए. डब्ल्यू. भुरे, प्रा.के.के. पारधी, खेडकर, ब्राम्हणकर, के.बी. चव्हाण, बोढे, निनावे, शेंडे, प्रा. शंभरकर, गडपायले, लेंढे व मुंगमोडे उपस्थित होते. सर्वप्रथम कवी कुसुमाग्रज व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या छायाचित्राचे पूजन दीप प्रज्वलन व माल्यार्पणाने करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांद्वारे कवी कुसुमाग्रज द्वारा रचित कवितांचे गायन करण्यात आले. प्रा. किरणापुरे यांनी, मराठी राजभाषा ही मानवी संस्कृतीचा अमूल्य अलंकार आहे. मराठी ही मायेची, जीवाभावाची, रक्ताची व मनाशी संवाद साधणारी प्रेमळ व आदरयुक्त अशी भाषा असून आपण तिला मायबोलीसुद्धा म्हणतो असे सांगितले. याप्रसंगी प्रा. ब्राम्हणकर, लेंढे, शेंडे, बोढे यांनीसुद्धा आपापले विचार मांडले. संचालन के.के. पारधी यांनी केले. आभार अधीक्षिका कांबळे यांनी मानले.