मांडोदेवी देवस्थानात १२५१ ज्योती कलशाची स्थापना

By admin | Published: April 14, 2016 02:31 AM2016-04-14T02:31:15+5:302016-04-14T02:31:15+5:30

गोंदिया जिल्ह्यातील लोक प्रसिद्ध देवस्थान मांडोदेवी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी चैत्रनवरात्र व रामनवमीच्या शुभपर्वावर १२५१ ज्योती कलशाची स्थापना करण्यात आली आहे.

The establishment of 1251 Jyoti Kalasha at Mandodhevi Devasthan | मांडोदेवी देवस्थानात १२५१ ज्योती कलशाची स्थापना

मांडोदेवी देवस्थानात १२५१ ज्योती कलशाची स्थापना

Next


निंबा (तेढा) : गोंदिया जिल्ह्यातील लोक प्रसिद्ध देवस्थान मांडोदेवी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी चैत्रनवरात्र व रामनवमीच्या शुभपर्वावर १२५१ ज्योती कलशाची स्थापना करण्यात आली आहे. रामनवमीनिमित्त या प्रसिद्ध देवस्थानात दररोज ब्राह्मणांद्वारे श्री रामचरित मानस महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. या यज्ञाचे लाभ घेण्यासाठी येथे हजारो भाविक भक्त जनांची गर्दी उमळून येते. या देवस्थानात जवळच्या गावातील व संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील भक्त हजारोच्या संख्येने दररोज दर्शनासाठी येतात. येथे दरवर्षी नवरात्र व रामनवमीनिमित्त सकाळी ११ वाजेपासून रात्री भक्तांच्या आगमनापर्यंत संपूर्ण नऊ दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. नवरात्रीच्या शेवटच्या दोन दिवसी भक्तजनांची संख्या जास्त असल्याने जवळच्या संजय गांधी हाय. व ज्युनिअर कॉलेज तेढा येथील विद्यार्थ्यांना महाप्रसाद वाटपाकरिता नेण्यात येते यासाठी हे विद्यार्थी स्वईच्छेने कसल्याही प्रकारणा मोबदला न घेता जातात. विद्युत उपकरणामुळे जगमगत्या झाडांना व इथल्या जंगलात असलेल्या एका झरण्यासारखे हुबेहुब दिसणारे सिमेंटने तयार करण्यात आलेल्या झरण्याचे आकर्षक व रोमहर्षक दृष्य पाहण्यासाठी दिवसापेक्षा रात्रीच्यावेळी भक्तांची गर्दी होत असते. येथे येणाऱ्या भक्तांच्या सोयीसुविधांचा पुर्णपणे लक्ष ठेवले जाते. त्यांच्या वाहनाकरिता १० रुपये पास ठेवून संपूर्ण सुरक्षा दिली जाते. तसेच जर कुणी लहान मुले हरविले तर त्यांना ताबडतोब शोधण्याकरिता त्यांचे नाव सुनावण्यात येते व त्यांना शोधण्यासाठी मांडोदेवी देवस्थान समिती बघेडा/तेढाचे सदस्य पूर्णपणे सहकार्य करतात.
स्थापन केलेल्या ज्योती कलशांचे विसर्जन रामनवमीच्या दिवशी या मंदिर परिसरातील भव्य तलावात वाजा-गाजा करत जवळच्या गावातील महिला व मुली भक्तांच्या सहाय्याने केले जाते. विसर्जनासाठी कोणीही स्वईच्छेने जाऊ सकते यावर कोणतीही अट नाही.
विसर्जनाकरिता येणारया महिला व मुलींना कापड, केली व अन्य फळांची भेट देवस्थान समितीकडून दिली जाते. दरवर्षी मांडोदेवी येथे मोठमोठ्या पर्वावर यात्रेचे आयोजन करण्यात येते. (वार्ताहर)

Web Title: The establishment of 1251 Jyoti Kalasha at Mandodhevi Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.