दिव्यांगांसाठी सल्ला व मार्गदर्शन कक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:24 AM2021-07-25T04:24:16+5:302021-07-25T04:24:16+5:30
तालुकास्तरावरील दिव्यांगांना जिल्हास्तरावर येण्यासाठी सामोरे जाणाऱ्या अडचणी लक्षात घेता दिव्यांग कल्याण आयुक्तालय (पुणे) यांच्या निर्देशानुसार या कक्षाची स्थापना करण्यात ...
तालुकास्तरावरील दिव्यांगांना जिल्हास्तरावर येण्यासाठी सामोरे जाणाऱ्या अडचणी लक्षात घेता दिव्यांग कल्याण आयुक्तालय (पुणे) यांच्या निर्देशानुसार या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती तालुकास्तरावर संबंधित पंचायत समितीत सोमवारी जाऊन दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, योजनांचे अर्ज याबाबत माहिती घेऊ शकतात. दिव्यांगांनी ऑनलाइन तयार केलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र यूडीआयडी कार्ड कार्यालयास प्राप्त होत आहेत.
दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे यूडीआयडी कार्ड तयार झाले असल्यास संबंधित पंचायत समिती स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सल्ला व मार्गदर्शन कक्षात दर सोमवारी प्राप्त होतील. तरी दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांच्याकरिता राबविण्यात येणाऱ्या योजना, योजनांचे अर्ज, यूडीआयडी कार्ड पंचायत समिती स्तरावरच प्राप्त करून घ्यावे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तुकाराम बरगे यांनी कळविले आहे.