पाणी वापर संस्थेची नवेगावबांध येथे स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:54+5:302021-08-01T04:26:54+5:30
नवेगावबांध पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. २००५ च्या पाणी कायद्यानुसार समित्या स्थापन करून अधिसूचना ...
नवेगावबांध पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. २००५ च्या पाणी कायद्यानुसार समित्या स्थापन करून अधिसूचना एक-दोन-तीन च्या प्रसिद्धीनंतर पाचशे हेक्टर ते ९७१ पर्यंत ओलीत क्षेत्र गृहीत धरून पाणी वापर संस्था स्थापित करायचे आहेत. पाचशे हेक्टरपर्यंत ९ सदस्य समितीमध्ये असतील तर ९०० हेक्टरपर्यंत १२ सदस्य या समितीमध्ये असतील या सर्व समित्या मिळून एक प्रकल्पीय समिती शासन स्तरावर राहील व ही शासनाची निगडित असून शासनाच्या अधिकाऱ्यांशी यांचा समन्वय असणार आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने नागपूरवरुन आलेले पाणीवापर संस्था रजिस्टर करण्याकरिता तज्ञ म्हणून सुरेंद्र पेठे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. अण्णा पाटील डोंगरवार, महादेव बोरकर, योगेश पुस्तोडे, तामदेव कापगते,रामदास बोरकर,सत्यभामा कोसरकर उपस्थित होते.
...........