इटियाडोह मत्स्य सहेागव संस्था (झेंडा)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:06+5:302021-08-17T04:34:06+5:30
सशस्त्र दूर क्षेत्र, गोठणगाव गोठणगाव : एओपी प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शस्त्र सलामी देण्यात आली. ...
सशस्त्र दूर क्षेत्र, गोठणगाव
गोठणगाव : एओपी प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शस्त्र सलामी देण्यात आली. पोलीस शिपाई सचिन तुळशीराम नखाते यांच्या संकल्पनेतून आदिवासी विकास हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी पाहुण्यांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आले. संचालन पोलीस हवालदार खंडाते यांनी केले.
आदिवासी सेवा सहकारी संस्था
गोठणगाव : येथील ध्वजारोहण संस्थाध्यक्ष सिगू कोवे यांनी केले. यावेळी संचालक गोपीनाथ दरवडे, डिगांबर कऱ्हाळे, देवराम हलमारे, भिवा मलगाम, नवाजी राणे, सत्यकला वाढवे, हरिश्चंद्र देव्हारी, श्रीराम उईके, शालीक कुंभरे, कुसूम परतेकी, कर्मचारी मिथून मेश्राम, रोषण राऊत, तंमुस अध्यक्ष लालदास डोंगरवार, डॉ. विजय घरतकर, कृषी विद्यार्थी दीप्ती घरतकर व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र
गोठणगाव : येथील ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष बोदेले यांनी केले. यावेळी रतीराम राणे, पोलीसपाटील कारुसेना सांगोळे, सरपंच जीजा चांदेवार, डॉ. खोब्रागडे, पतीराम राणे, ग्रामपंचायत सदस्य देवा नारनवरे, पीएसआय शेख, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व गावकरी उपस्थित होते. तसेच ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड योद्धा म्हणून काम केले, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
गोठणगाव : येथील ध्वजारोहण शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय ईश्वार यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक कापगते, सहायक शिक्षक कापगते, तंमुस अध्यक्ष लालदास डोंगरवार, सरपंच जीजा चांदेवार, ग्रामसेवक फटिंग, अंगणवाडी सेविका मदतनीस, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय
गोठणगाव : ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जीजा चांदेवार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीसपाटील कारुसेना सांगोळे, तंमुस अध्यक्ष लालदास डोंगरवार, रतीराम राणे, ग्रामसेवक फटिंग, सदस्य देवा नारनवरे, नरेंद्र कोडापे, जितेंद्र निकोडे, उमराव कन्हाळे, मोहिता जुगनाके, पुष्पा हटवार, हिरा किरसान, वैशाली सोनटक्के, डॉ. आशिष बोदेले, डॉ. खोब्रागडे, अंगणवाडी सेविका व मदतनीस, गावातील नागरिक उपस्थित होते.