इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पर्यटनस्थळ पडले ओसाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:00 AM2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:37+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पावसाळ्यात हिरवागार शालू परिधान करुन नव्या नवरीसारखे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहते. पावसाळयात या भागातील नैसर्गिक हिरवेगार मनमोहक दृश्य व पर्वतरांगा पर्यटकांच्या आनंदात भर घालतात. त्यात अजून इटियाडोहमधून होणारा पाण्याचा विसर्ग, धबधबा स्थळ व ध्वनी कंपनाची नैसर्गिक प्रक्रिया पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग होवून जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी प्रमुख स्थळ म्हणून पर्यटकांसाठी इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड हे स्थळ आकर्षणाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात हे पर्यटनस्थळ पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलून जाते. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे या स्थळावर अवकळा पसरली असून ओसाड पडल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. परिणामी पर्यटनस्थळावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पावसाळ्यात हिरवागार शालू परिधान करुन नव्या नवरीसारखे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहते. पावसाळयात या भागातील नैसर्गिक हिरवेगार मनमोहक दृश्य व पर्वतरांगा पर्यटकांच्या आनंदात भर घालतात. त्यात अजून इटियाडोहमधून होणारा पाण्याचा विसर्ग, धबधबा स्थळ व ध्वनी कंपनाची नैसर्गिक प्रक्रिया पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग होवून जाते. परंतु यावर्षी कोरोना महामारीने प्रतापगड व इटियाडोह जलाशय ओस पडले आहेत. या स्थळांवर अवकळा आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या पर्यटनस्थळावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-छोट्या व्यावसायीकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सहजच मार्गी लागत असे. मात्र यावर्षीचे चित्र बघता त्यांच्यावर उपासमारीचे संकट घोंगावत असल्याचे दिसून येते. या परिसरातील अत्यंत विलोभनीय दिसणाऱ्या पर्वत रांगा, इटियाडोह जलाशयात मध्यभागी उभ्या असलेल्या हिरव्यागार टेकड्या पर्यटकांसाठी सेल्फीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोरोनाच्या महामारीने पर्यटकांची इच्छाशक्ती मारली जावून इच्छाशक्तीवर कोरोनामुळे पाणी फिरविल्याचे दृश्य दिसून येत आहेत.
या दोन्ही स्थळांना भेट दिली असता कोरोना काळात कोणीही पर्यटक येत नसून येथील छोट्या-छोट्या व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगण्यात आले. या पर्यटनस्थळाकडे जशी पर्यटकांनी पाठ फिरविली तशीच शासनाने सुद्धा पाठ फिरविल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या मुलभूत सुविधा उदा. पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह व पार्कीग व्यवस्थेची पार वाट लागली असल्याचे दिसून आले. इटियाडोहच्या मुख्य कॅनलवर गैरसोय निर्माण करणाºया झुडपांची वाढ झाल्यानमे त्यांची छाटणी होणे अपेक्षीत आहे. पर्यटक नसले तरीही या मुुुलभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक असून पर्यटनस्थळाच्या विकासात भर घालीत असतात हे निश्चित.