स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला त्यांना मिळाली शिधापत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:21 PM2019-08-14T22:21:27+5:302019-08-14T22:23:43+5:30

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी येथील मांगगारूडी समाजाची वस्ती अण्णाभाऊ साठे नगर येथे शिधापत्रिकांचे वाटप आणि आधार नोंदणी शिबिर घेण्यात आले.त्यामुळे अनेक वर्षांनंतर या वस्तीतील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.

On the eve of independence, he received a scholarship | स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला त्यांना मिळाली शिधापत्रिका

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला त्यांना मिळाली शिधापत्रिका

Next
ठळक मुद्देआधार नोंदणीला सुरूवात : मांगगारुडी समाजाची वस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी येथील मांगगारूडी समाजाची वस्ती अण्णाभाऊ साठे नगर येथे शिधापत्रिकांचे वाटप आणि आधार नोंदणी शिबिर घेण्यात आले.त्यामुळे अनेक वर्षांनंतर या वस्तीतील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.
आमचे स्वातंत्र्य आता ७२ वर्षाचे झाले. परंतु अजूनही मुलभूत सोयींपासून वंचित असलेला हा समाज त्यांच्या हाती शिधापत्रिका पडल्याने आणि आधारकार्डची नोंदणी झाल्याने बऱ्याच वर्षांनंतर समाधानी दिसत होता.ज्यांच्याकडे जन्माचे दाखले नाहीत त्यांची आधार नोंदणी होऊ शकली नाही. ज्यांचा जन्मच रस्त्यावर, कधी जंगलात, कधी ट्रेनमध्ये, कधी कुठल्या प्रांतात झाला. नोंदणी कुठे करावी हे सुद्धा त्यांना माहिती नव्हते. त्यांच्या विवाहाची नोंदणी,ना जन्माच्या नोंदणी नाही अशा वेळेस यांचे आधार कार्ड तयार करायचे कसे? तर आधारकार्डसाठी मोबाईल लिंकिंग पाहिजे त्यांच्याजवळ मोबाईलच नाही तो ओटीपी नंबर येईल कसा?जन्माच्या दाखल्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली. त्यासाठी वकीलासोबत बोलणं केलं? मात्र हे सर्व करण्याची वेळ येण्यापूर्वीच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या वस्तीतील नागरिकांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.जवळपास सर्वांच्याच शिधापत्रिका तयार झाल्या.
यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती नुकतेच बदलून गेलेले विशेष समाज कल्याण अधिकारी मंगेश वानखेडे आणि विद्यमान विशेष समाज कल्याण अधिकारी वाकले यांनी. मागील अनेक वर्षांपासून या वस्तीतील नागरिकांना त्यांच्या हक्काची शिधापत्रिका मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर आणि त्यांची पती धनेंद्र भुरले यांनी सातत्याने शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. बुधवारी (दि.१४)अधिकाऱ्यांच्या उपस्थित वस्तीतील नागरिकांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तर आधारकार्ड नोंदणीला सुध्दा सुरूवात करण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांच्या चेहºयांवर स्वातंत्र्यांच्या पूर्वसंध्येला आनंद झळकता होता.

Web Title: On the eve of independence, he received a scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.