९ वर्षे लोटूनही वेतन श्रेणी लागली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 05:00 AM2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:24+5:30
मानधन तत्वावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवाकाळाचे ३ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना नियमित करुन त्या पदानुसार वेतनश्रेणी लागू करणे गरजेचे होते. पण शासनाचे आदेश निघालेच नाही असे करीत या कर्मचाºयांचे ८ वर्ष निघून गेले. तेव्हा काही लोकांनी वेतनश्रेणीसाठी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : जिल्हा परिषदेच्या आस्थापना विभागातंर्गत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या १० कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ ९ वर्षांचा झाला तरी त्यांना वेतनश्रेणी लावून नियमित करण्यात आले नाही. परिणामी संबंधीत कर्मचारी आजही दोन हजार रुपये महिना प्रमाणे तुटपुंज्या मानधनावर आपले कर्तव्य बजावित आहेत.
मानधन तत्वावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवाकाळाचे ३ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना नियमित करुन त्या पदानुसार वेतनश्रेणी लागू करणे गरजेचे होते. पण शासनाचे आदेश निघालेच नाही असे करीत या कर्मचाºयांचे ८ वर्ष निघून गेले. तेव्हा काही लोकांनी वेतनश्रेणीसाठी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली.
यावर या कर्मचाऱ्यांना ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील सेवा काळात ५२००-२०२०० ग्रेड पे लावून नियमित करण्याचे नियुक्त आदेश देण्यात यावे असा निर्वाळा न्यायालयाने १ ऑक्टोबर २०१९ रोजी केला. या निकालास आज जवळपास ९ महिने लोेटले तरी जिल्हा परिषदेने न्यायालयाचे आदेश मान्य करुन त्या कर्मचाऱ्यांना नियमित केल्याचे नियुक्ती आदेश दिले नाही.
आपल्या वेतनश्रेणीची समस्या घेवून कर्मचाऱ्यांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे मदत मागीतली. यावर आमदार चंद्रिकापुरे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे कर्मचारी नियमित होऊन व वेतनश्रेणी लागू होण्याच्या आदेशाची वाट बघत आहेत.