९० लाख खर्चूनही पूल अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:33 AM2018-11-24T00:33:01+5:302018-11-24T00:33:52+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार -डोंगरगावला जोडणाऱ्या पुलावर ९० लाख रूपयांचा निधी खर्च करुनही पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. यात काहींचे हात ओले झाल्याचे बोलल्या जाते.त्यामुळे या बांधकामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Even after spending 90 lakhs, the pool is half-way | ९० लाख खर्चूनही पूल अर्धवटच

९० लाख खर्चूनही पूल अर्धवटच

Next
ठळक मुद्देविकास कामांना ब्रेक : दोन किमी अंतरात दीडशे खड्डे, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार -डोंगरगावला जोडणाऱ्या पुलावर ९० लाख रूपयांचा निधी खर्च करुनही पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. यात काहींचे हात ओले झाल्याचे बोलल्या जाते.त्यामुळे या बांधकामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळख असणारे डोंगरगाव (खजरी) येथील विकास कामांना मागील काही दिवसांपासून खीळ बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. याकडे ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे. डोंगरगाव (खजरी) येथे विविध कामे मंजूर आहेत. मात्र मंजूर कामाच्या पुर्णत्वासाठी अद्यापही पाठपुरावा न झाल्याने या विकास कामांना ब्रेक लागला आहे. परसोडी ते डोंगरगाव दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण ३० लाख रूपयाचे काम, पाणी पुरवठा योजनेचे काम ६० लाख रूपयाचे, ३५ केव्हीचे वीज उपकेंद्र अद्यापही सुरू झाले नाही. विकास कामांना ब्रेक लागल्यामुळे गावकºयांमध्ये रोष आहे. या गावात ग्रामसेवक राहत नाही.सरपंच दिनेश हुकरे अर्जुनीत राहतात. त्यामुळे गावातील विकास कामांवर परिणाम होत आहे. याकडे ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी लक्ष देवून गावातील विकास कामांना गती देण्याची मागणी होत आहे. इंदिरा कोरे यांच्या घरकुल योजनेचा ठराव जिल्हा परिषदेने पंचायत समितीला पाठवायला हवा होता. परंतु त्यांचा ठराव अद्यापही पाठविला नाही. या ठरावाचा पाठपुरावा जि.प.सदस्यांनी करायला हवा होता. परंतु त्यांनीही केला नाही. त्या ठरावा शिवाय पंचायत समिती काम करू शकत नाही, असे उपसभापती राजेश कठाणे यांनी सांगितले. ठराव मिळाला तर आम्ही रोहयोतून तातडीने घरकुल योजनेचे काम करू असे त्यांनी सांगितले. तत्कालीन मुकाअ रविंद्र ठाकरे यांनी आमसभेत घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांची दुसºयाच दिवशी बदली झाल्याने हे घरकुल रखडले आहे. पाणी पुरवठा योजना तातडीने राबवली नाही तर निधी परत जाण्याचा धोका आहे. गावात पाणी टंचाई आहे. गेटवाढ मध्ये नळ योजनाच नाही त्यामुळे ब्राम्हणकर ते बन्सोड यांच्या घरापर्यंत नळच नाहीत. ग्रामपंचायतने या नव्या वस्तीत तातडीने नळ योजनेची पाईप लाईन टाकणे गरजेचे आहे. परसोडी ते डोंगरगाव या दोन किमी अंतरात दीडशे खड्डे पडले आहेत. मात्र हा रस्ता जिल्हा परिषदेचा याच विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Even after spending 90 lakhs, the pool is half-way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.