लाखो रुपये खर्चूनही कोल्हापुरी बंधारे शोभेचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:52 AM2018-04-19T00:52:14+5:302018-04-19T00:52:14+5:30
दुष्काळी स्थिती बंधाऱ्याच्या मदतीने शेतीला सिंचनाची सोय करता यावी. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. बंधारे तयार केल्यानंतर मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेची वस्तू ठरत आहे.
राजेश मुनीश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : दुष्काळी स्थिती बंधाऱ्याच्या मदतीने शेतीला सिंचनाची सोय करता यावी. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. बंधारे तयार केल्यानंतर मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेची वस्तू ठरत आहे.
शिवकालीन काळातील माती अडवा, पाणी जीरवा हा मुलमंत्र पुढे जोपासत तालुक्यातील वडेगाव, रेंगेपार, बाम्हणी-सावंगी, मनेरी, डव्वा, कोसमतोंडी, पांढरी, खाडीपार, घोटी, सौंदड, राका, सिंदीपार, शेंडा, जांभळी, दोडके, पाटेकुर्रा, कोकणा-जमी, बाम्हणी-खडकी, ओवारा, देवपायली, घाटबोरी, कोहमारा, डुग्गीपार, पांढरवानी, खोबा, घोटी, म्हसवानी, खोडशिवनी, गिरोला, टेमनी या भागात मोठ मोठे कोल्हापुरी बंधारे आजही अस्तीत्वात आहेत. या बंधाºयांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होवू शकते. मात्र बंधाºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बंधाºयांना मोठ मोठे भगदाड पडले आहे.
त्यामुळे यामध्ये पाणी साठवून राहण्याऐवजी ते वाहून जात आहे. परिणामी शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. सिंचन विभाग या जुन्या कोल्हापुरी बंधाºयाची डागडुजी करण्याऐवजी नवीन बंधारे तयार करण्यावर भर देत आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात सौंदड-राका येथे लाखो रुपये खर्चून मोठा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. पण त्यांची योग्य देखभाल दुरूस्ती न केल्याने त्यांची हालत खस्ता झाली आहे. विशेष म्हणजे या बंधाऱ्यांकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.
दोन्ही बंधाऱ्यांत पाण्याचा अभाव
काळा गोटा १ व २ हा कोल्हापुरी बंधारा तयार केल्यानंतर या बंधाºयांमध्ये एकही वर्षी पाणी साठवून ठेवण्यात आले नाही. विशेष म्हणजे पुराचा तडाखा बसल्याने या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला खिंड पडली. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे लाखो रुपये खर्चून करुन तयार करण्यात आलेले हे दोन्ही बंधारे केवळ नावापुरतेच ठरत आहे.
तालुक्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्र
सडक-अर्जुनी तालुक्याचे एकूण ५५ हजार ४६१ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. यात पिकाखालील क्षेत्र २५ हजार ७८८ हेक्टर आर क्षेत्राचा समावेश आहे. कोरडवाहू क्षेत्र ८ हजार ९१७ हेक्टर आर आहे. तालुक्यात धान, तूर, तिळ, उस, मूंग, टरबूज, भेंडी, काकडी, चवळी, दोडके आदींचे उत्पादन घेतले जाते.
तर हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
वडेगाव येथील काळा गोटा १ व २ या बंधाºयाची केवळ डागडुजी केल्यास रेगेंपार, वडेगाव, डोयेटोला, मुनीश्वर पाटीलटोला, केसलवाडा, पांढरवानी, परसोडी, डोंगरगाव, खजरी, नवाटोला या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा होईल. वडेगाव, डोंगरगाव, परसोडी, केसलवाडा, सडक-अर्जुनी या परिसरात पडीक असलेल्या शेकडो हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होईल. शिवाय शेतकºयांना दुबार पिके घेता येता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.