राखीच्या पर्वातही प्रवाशांची अत्यल्प गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:37+5:302021-08-22T04:31:37+5:30
गोंदिया : राखी पौर्णिमा तोंडावर आली असतानाच भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी तिच्या घरी हमखास जातोच. शिवाय, सध्या ...
गोंदिया : राखी पौर्णिमा तोंडावर आली असतानाच भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी तिच्या घरी हमखास जातोच. शिवाय, सध्या रेल्वे, एसटी तसेच हवाई प्रवासालाही परवानगी देण्यात आली असून कोरोना नियंत्रणात दिसून येत आहे. अशात भावाला आपल्या बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधून घेण्यास काहीच अडचण उरली नाही. विशेष म्हणजे, राखी पौर्णिमा रविवारी सुटीच्या दिवशीच आल्याने नोकरदार वर्गाचेही फावले आहे. यामुळेच रेल्वे व एसटीमध्ये चांगलीच गर्दी वाढण्याचे संकेत दिसून येत आहेत. मात्र येथील आगारातील शनिवारची स्थिती बघता अत्यल्प प्रवासी दिसून आलेत. म्हणजेच, सणासुदीचे दिवस असतानाही नागरिकांनी आरोग्याकडे बघता प्रवास टाळल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यातही आता नागरिकांनी प्रवासी वाहनांतून प्रवासाला बगल दिली असून आपल्या खाजगी वाहनानेच प्रवासाला प्राधान्य दिले असल्याचे दिसत आहे. परिणामी एसटीमध्ये अत्यल्पच प्रवासी दिसत आहेत.
-------------------------------
१) दोन कॉलम फोटो (बस स्थानकावरील गर्दीचा फोटो)
------------------------
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या
- गोंदिया- नागपूर
-गोंदिया- रजेगाव
- गोंदिया- देवरी
गोंजिया- सालेकसा
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
-गोंदिया- नागपूर
- गोंदिया- रजेगाव
-गोंदिया- देवरी
-गोंदिया- सालेकसा
----------------------------
प्रवाशांची अत्यल्प गर्दी
मागील वर्षापासून कोरोनामुळे नातेसंबंध फक्त मोबाईलपुरतेच मर्यादित राहिले आहेत. मात्र आता कोरोना नियंत्रणात असून त्यात सुटीच्या दिवसी राखीचा सण आला आहे. यामुळे एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी अपेक्षित होती. मात्र असे न होता फक्त मोजकेच प्रवासी दिसून आल्याने नागरिकांनी सणासुदीतही प्रवासाला बगल दिल्याचे दिसून आहे.
------------------------
कोट
कोरोना नियंत्रणात असून राखी सुटीच्या दिवशी आल्यामुळे व आता सणासुदीला सुरूवात झाल्याने प्रवासी संख्या वाढणार असे अपेक्षित होते. मात्र तसे दिसून येत नसून तरिही रविवारपासून आगाराकडून फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत.
- संजना पटले, आगार प्रमुख, गोंदिया.