आजच्या काळातही ‘इमानदारी’ कायम

By admin | Published: July 6, 2017 02:11 AM2017-07-06T02:11:30+5:302017-07-06T02:11:30+5:30

आजच्या काळात भ्रष्टाचार व बेईमानी फोफावली असतानाच रेल्वे गाडीत दागिने व रोख रकम असलेली बॅग मिळालेल्या इसमाने

Even today, 'honesty' persists | आजच्या काळातही ‘इमानदारी’ कायम

आजच्या काळातही ‘इमानदारी’ कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंडीकोटा : आजच्या काळात भ्रष्टाचार व बेईमानी फोफावली असतानाच रेल्वे गाडीत दागिने व रोख रकम असलेली बॅग मिळालेल्या इसमाने बॅगमधील मोबाईलने संपर्क साधून ज्यांची बॅग त्यांना परत केली. या घटनेवरून आजही ‘इमानदारी’ कायम असल्याचा प्रत्यय येतो.
मुंडीकोटा येथील आयडीबीआय बँक शाखेत अविंद्र सुखदेव भावे हे रोखपाल या पदावर कार्यरत आहेत. ते गोंदिया-मुंडीकोटा दुर्ग लोकल गाडीने नेहमीच प्रवास करतात.
याच गाडीतून आमगावावरुन काही महिला बालाघाट (मध्य प्रदेश) येथे जाण्याकरिता या गाडीत बसल्या होत्या. त्या गोंदिया स्थानकामध्ये उतरून लगेच बालाघाट गाडी पकडण्याकरिता बालाघाट गाडी लागलेल्या प्लॅटफार्मवर गेल्यात. पण त्यांची बॅग दुर्ग-इतवारी या पॅसेंजर गाडीच्या बोगीत विसरली होती. त्याच बोगीत भावे मुंडीकोटाला येण्यासाठी चढले असताना त्यांना त्या महिलांची विसरलेली बॅग मिळाली.
त्या बॅगमध्ये रुपये व सोन्याचे दागिने होते. भावे यांनी बॅगमध्ये असलेल्या मोबाईलवरुन त्यांच्या नातलगांना फोन केला.
त्यामुळे त्यांचे नातेवाईक मुंडीकोटा आयडीबीआय बँकेत आलेत. त्यावेळी मिळालेली बँग त्यांना देण्यात आली.
या घटनेवरून आजही खरेपणा कायम असल्याचे दिसून येते. भावे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून बॅग परत केली. त्यामुळे भावे यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Even today, 'honesty' persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.