प्रत्येक संकटसमयी काँग्रेस शेतकºयांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 09:40 PM2017-08-20T21:40:28+5:302017-08-20T21:40:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे रोवणीचे खरे आकडे पाठवावे अन्यथा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. तर प्रत्येक संकटसमयी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस त्यांच्या पाठिशी उभी असल्याचे आश्वासन देत त्यांना आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिलासा दिला.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची आमदार अग्रवाल यांनी बुधवारी (दि.१६) पाहणी केली. यादरम्यान ग्राम तेढवा येथे शेतकºयांशी चर्चा करताना ते बोलत होते. आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील ग्राम दासगाव खुर्द, दासगाव बू., निलज, तेढवा यासह अन्य गावांचा दौरा करून वर्तमान स्थिती जाणून घेतली.
याप्रसंगी शेतकºयांनी, परिसरातील बहुतांश शेतकºयांची खार (रोपे) मरत असल्याचे सांगीतले. अशात आता पाऊस आला तरिही दुबार पेरणीची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. त्यात कृषी व सिंचन विभागाकडून काहीच मदत मिळत नसल्याचेही शेकतºयांनी सांगीतले.
अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना १० हजार रूपयांचे तातडीचे कर्ज मिळाले नाही. शिवाय आॅनलाईन पिक विमा न झाल्याने पूर्णपणे अडकल्याची व्यथा शेतकºयांनी आमदार अग्रवाल यांच्यापुढे मांडली.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे, तहसीलदार चव्हाण, पंचायत समिती सभापती माधुरी रहांगडाले, सदस्य अनील मते, बाजार समिती संचालक आनंद तूरकर, गोविंद तूरकर यांच्यासह कृषी विभागाचे अन्य अधिकारी होते.
मुख्यमंत्र्याकडे मांडली वास्तविकता
स्वत: केलेली पाहणी व शेतकºयांची व्यथा जाणून घेतल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यात त्यांनी, जिल्हाधिकाºयांकडून ५० टक्के रोवणीचे आकडे दिले जात असताना, प्रत्यक्षात ३०-३५ टक्क्यांपेक्षा जास्त रोवणी झाली असल्याची माहिती दिली. तर झालेली रोवणीही पाण्याअभावी करपत चालली असून जिल्ह्यातील नदी, नाले व तलाव कोरडे आहेत. त्यामुळे भविष्यात जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार असल्याचे सांगत जिह्यातील वास्तवीकतेशी अवगत करविले.