प्रत्येक ग्रा.पं.राबविणार ‘प्लास्टीकमुक्त’ पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 09:17 PM2017-12-24T21:17:44+5:302017-12-24T21:18:01+5:30

‘अडाणी आई घर वाया जाई, शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ ही म्हण ओळखून समाजाची दिशा बदलविण्याचे काम महिलाच करू शकतात. ही बाब ओळखून जिल्हा परिषदेने नवीन वर्षाची सुरूवात स्वच्छ व प्लास्टीकमुक्त गोंदिया करण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी केली.

Every Grrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrhu | प्रत्येक ग्रा.पं.राबविणार ‘प्लास्टीकमुक्त’ पहाट

प्रत्येक ग्रा.पं.राबविणार ‘प्लास्टीकमुक्त’ पहाट

Next
ठळक मुद्देजि.प.चा पुढाकार : ग्रामसभेत करणार निर्धार, कार्यक्रमात देणार नागरिकांना स्वच्छतेचे धडे

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘अडाणी आई घर वाया जाई, शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ ही म्हण ओळखून समाजाची दिशा बदलविण्याचे काम महिलाच करू शकतात. ही बाब ओळखून जिल्हा परिषदेने नवीन वर्षाची सुरूवात स्वच्छ व प्लास्टीकमुक्त गोंदिया करण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी केली. त्याला ‘स्वच्छ व प्लास्टीकमुक्त पहाट’ असे नाव देण्यात आले. याच अंतर्गत जिल्ह्यात प्लास्टीकमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी १ जानेवारीला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचातमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे.
सध्या स्थितीत सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान प्लास्टीकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. पत्रावळ, चमचे, वाटी, ग्लास प्लास्टीकच्याच वापरल्या जात आहेत. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व प्लास्टीकचे साहित्य त्याच ठिकाणी पडून असतात. हे प्लास्टीक पर्यावरणास सर्वाधिक हानीकारक ठरत आहे.
प्लास्टिकचा वापर करू नका अशी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी १ जानेवारी २०१८ रोजी गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश काढले आहेत. प्लास्टीकचा वापर करू नका अशी जनजागृती केल्यानंतर प्लास्टीकच्या जागी कागदापासून तयार होणाºया पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले जाणार आहे. या उपक्रमात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी महिलांसाठी विविध स्पर्धा, हळदी कुंकूचे कार्यक्रम प्रत्येक अंगणवाडीत घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, स्वच्छ भारत मिशन व उमेद यांचा कृतीसंगमातून गोंदिया जिल्ह्यात स्वच्छ व प्लास्टीकमुक्त पहाट राबविली जाणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणार गोंदिया जि.प.पहिलीच आहे.

स्वच्छ व प्लास्टीकमुक्त गोंदिया करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. प्लास्टीकमुक्त गोंदियासाठी सर्व व्यापाºयांच्या बैठका घेऊन त्यांना प्लास्टीकचा वापर करु नका, असे आवाहन केले जाणार आहे. पर्यावरणाला घातक प्लास्टीकचा वापर करू नका प्लास्टीक उघड्यावर टाकू नका असा संदेश नागरिकांना देण्यात येणार आहे.
रविंद्र ठाकरे
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया.
१७५७ अंगणवाड्यात महिलांना मार्गदर्शन
पुढे मकरसंक्रात येत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील १७५७ अंगणवाड्यात महिलांसाठी हळदीकुंकू व वाण वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महिलांना स्वच्छ व प्लास्टीकमुक्त परिसर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येक अंगणवाडीत ७० ते ८० महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेतला जाणार आहे. यावेळी महिलांना स्वच्छतेसंदर्भात चित्रफित दाखविण्यात येणार आहे.
महिलांना मिळेल प्रोत्साहन
प्रत्येक ग्रामपंचायत १ जानेवारीला विशेष ग्रामसभा या उपक्रमाच्या निमीत्ताने घेईल. परंतु महिलांसाठीच विशेष ग्रामसभा ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी घेण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी महिलांची उखाणा स्पर्धा घेतली जाणार आहे. या उखाणा स्पर्धेला तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस दिले जाणार आहेत. सलग २० ते २२ दिवस हळदी कुंकू कार्यक्रम घेतला जाणार आहे.

Web Title: Every Grrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.