प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देणे गरजेचे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:47+5:302021-04-03T04:25:47+5:30
गोंदिया : विधानसभा निवडणुकीनंतर हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अशात आता बूथ स्तरावर नवीन कार्यकारिणी ...
गोंदिया : विधानसभा निवडणुकीनंतर हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अशात आता बूथ स्तरावर नवीन कार्यकारिणी गठित करून प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी सोपविणे गरजेचे आहे. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच प्रत्येक मतदातापर्यंत भारतीय जनता पक्ष व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा संदेश पोहचविता येणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने बुधवारी आयोजित शहर कार्यकर्ता विशेष सभेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित सभेला प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, संजय कुलकर्णी, भरत क्षत्रिय, जयंत शुक्ला, अमित झा, बंटी पंचबुद्धे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, महिला मोर्चा शहर अध्यक्ष निर्मला मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते. अग्रवाल यांनी, कोरोना काळातील वीज बिलाच्या वसुलीसाठी आता जोडणी कापली जात आहे. आघाडी सरकारने आपल्या कार्यकर्त्यांना धान खरेदी केंद्र वाटून धान खरेदीत राजकारण व भ्रष्टाचाराची कीड लावली आहे. शासकीय कार्यालयात पदे रिक्त असून प्रभारींच्या भरवशावर कारभार चालविला जात आहे. सरकारचे हे अपयश आम्हाला प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना प्रेरित करावे लागणार असे सांगितले. सभेला शंभूशरण ठाकूर, धर्मेंद्र डोहरे, मुकेश चन्ने, गुड्डू कारडा, अफसाना पठाण, नेहा शर्मा, नीलिमा माणिकपुरी, आशालता देशमुख, प्रमिला सिंद्रामे, मौसमी परिहार, जितेंद्रसिंह गौर, ऋषिकांत साहू, अशोक जयसिंघानी, मनीष पोपट, सतीश मेश्राम, संजय मुरकुटे, चंद्रभान सराते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.