तिल्ली मोहगांव येथील बूथ क्रमांक ४८ मध्ये ईव्हिएममध्ये बिघाड, ९ पासून मतदान थांबलं
By अंकुश गुंडावार | Published: April 19, 2024 11:54 AM2024-04-19T11:54:40+5:302024-04-19T11:55:06+5:30
गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव मशीन बिघडल्याने सकाळी नऊ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत सर्व मशीन बंद पडल्याने मतदार केंद्रावर एकच तारांबळ उडाली.
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव मशीन बिघडल्याने सकाळी नऊ वाजेपासून सर्व मशीन बंद पडल्याने मतदार केंद्रावर एकच तारांबळ उडाली. तिल्ली मोहगाव हा भाग चिमूर लोकसभा क्षेत्रात येतो. बुथ क्रमांक ४८ वर सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यातच दोन तास मशीन चालल्यानंतर अचानक मशीन मध्ये बिघाडी आली.
फक्त २६१ मतदान या मशीनवर झाले. गेल्या तीन तासापासून सदर मशीन बिघडल्या अवस्थेत असल्याने मतदान थांबविण्यात आले होते. सकाळी ११:३० वाजता मतदान सुरळीत झाले.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.१९) पहिल्या टप्यात मतदान झाले. मतदारसंघातील एकूण २१३३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तिव्रता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहचत आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. सकाळी ७ ते ११ या कालावधीत मतदारसंघात १९.७२ टक्के मतदान झाले होते.