पोलीस मुख्यालयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:25 PM2019-01-17T23:25:03+5:302019-01-17T23:25:48+5:30

आगामी लोकसभा विवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सर्व घटकांना समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांच्या शंका दूर करण्यासाठी निवडणूक विभागकडुन जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहे.

EVM-VVPAT awareness at the police headquarters | पोलीस मुख्यालयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

पोलीस मुख्यालयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आगामी लोकसभा विवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सर्व घटकांना समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांच्या शंका दूर करण्यासाठी निवडणूक विभागकडुन जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदारांचे सहभाग नोंदविण्यासाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्र म संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे.
मतदार जनजागृती कार्यक्र मांतर्गत जिल्हा पोलीस मुख्यालय कारंजा येथे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मतदान प्रात्याक्षीक कार्यक्रम राबविण्यात आले. या ठिकाणी ८४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईव्हीएमवर प्रत्यक्ष मतदान केले. मार्गदर्शन व माहिती जिल्हास्तरीय पथकाचे प्रमुख बी. डी. भेंडारकर यांनी उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमात ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे प्रात्याक्षीक दाखवून मतदान प्रक्रियेची कार्यप्रणाली सांगण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक गोठेकर पोलीस उपनिरिक्षक पी.बी.ओड, एन.के.वाघ व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: EVM-VVPAT awareness at the police headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.