भाजपकडून माजी सैनिकांचा सत्कार
By Admin | Published: October 7, 2016 01:59 AM2016-10-07T01:59:12+5:302016-10-07T01:59:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात पाक व्याप्त काश्मीरमध्ये सिर्जकल स्ट्राईक करून पाकिस्थानातील आतंकवाद्यांचा खात्मा करणाऱ्या
विनोद अग्रवाल : शहर भाजप तर्फे माजी सैनिकांचा सत्कार
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात पाक व्याप्त काश्मीरमध्ये सिर्जकल स्ट्राईक करून पाकिस्थानातील आतंकवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सेनेने आमच्या १८ जवानांच्या हौतातम्याचा बदल घेतला असून ही आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. हे सैनिक आमची आन-बान-शान आहेत, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
ते प्रभाग क्रमांक १ मध्ये न्यू लक्ष्मीनगर येथील ब्रह्मकुमारी चौक येथे शहर भाजपतर्फे आयोजित माजी सैनिकांच्या सत्कार कार्यक्र मात रविवारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, देशाच्या रक्षणार्थ सीमेवर रात्रंदिवस पहारा देऊन नागरिकांची सुरक्षा करणारे सैनिक आपल्या जीवाची पर्वा करीत नाही. ते जागून रक्षण करतात. म्हणूनच आपण आपल्या घरी निवांत झोपतो. देशाच्या रक्षणार्थ वीर मरण पत्करणारे शहीद जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा आम्हाला अभिमान आहे. हे सैनिक फक्त सीमेवर लढत नाही तर देशात कुठेही आतंकवाद, नक्षलवाद यांचा खात्मा करण्याकरिता व कुठल्याही आपत्तीच्या वेळी जनतेच्या सुरक्षेकरिता तत्पर असतात, असे ते म्हणाले.
भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्र मात प्रामुख्याने न.प. बांधकाम सभापती जितेंद्र (बंटी) पंचबुद्धे, न.प. गटनेता दिनेश दादरीवाल, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष चौहान, नगरसेविका मैथुला बिसेन, नगरसेवक घनश्याम पानतावणे, भरत क्षत्रिय, जयंत शुक्ला, पद्माकांत चौधरी उपस्थित होते.
याप्रसंगी सभापती पंचबुद्धे म्हणाले की, जे सैनिक आपले सर्वस्व त्याग करून आमची रक्षा करतात, त्यांचे आपण ऋणी आहोत व राहणार. त्यांचे मनापासून आभार मानण्याकरिता सैनिकांचा सत्कार कार्यक्रम घेत असल्याचे ते म्हणाले.
या वेळी दिनेश दादरीवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आमचे सैनिक हीच आमची ताकत असल्याचे सांगून आमची प्रेरणा असल्याचे म्हणाले. भारत माता की जय, वंदे मातरण व जय हिंदच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेले होते. माजी सैनिक रमेश भुते यांनीही सत्काराला देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला. सत्कारमूर्तीमध्ये माजी सैनिक भरत भलावी, सुरेश शेंडे, देवेंद्र भगत, इंदल पारधी, विनोद ठाकरे, रमेश भुते, किशोर धामडे, टेकेश्वर पटले, कुवरलाल कटरे, प्रभाकर चोरनेले, भूमेश्वर हेमने, केवलराम रहांगडाले, रामशंकर पटले, महेशचंद्र अग्रवाल, लोकेश ढोरे, श्यामकुमार पाचे, महेश चित्रिव, डीलाराम कावडे, खुबलाल अंबुले, रमेश रहांगडाले, संजय रहांगडाले, विजय पराते, रमेश तिवारी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
माजी सैनिक प्रकाश मेश्राम, गजेंद्र कावडे, रामचरण साते, गणेश चौधरी व उमाशंकर लोणारकर यांचा त्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शैलेंद्र जैन यांनी केले तर आभार रामलाल पारधी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)