जिल्ह्यात ग्रामस्वच्छतेची तपासणी

By Admin | Published: January 3, 2016 02:19 AM2016-01-03T02:19:38+5:302016-01-03T02:19:38+5:30

जिल्ह्यातील विविध गावात स्वच्छता कशी आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय आहे किंवा नाही. लोक उघड्यावर तर शौचासाठी जात नाही ...

Examination of Village Cleanliness in the District | जिल्ह्यात ग्रामस्वच्छतेची तपासणी

जिल्ह्यात ग्रामस्वच्छतेची तपासणी

googlenewsNext

उस्मानाबादची चमू : स्वच्छता स्पर्धेत असलेल्या गावांचा केला दौरा
सडक-अर्जुनी : जिल्ह्यातील विविध गावात स्वच्छता कशी आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय आहे किंवा नाही. लोक उघड्यावर तर शौचासाठी जात नाही याची तपासणी करण्यासाठी उस्मानाबादची चमू गोंदिया जिल्ह्यात आली. या चमूने सडक-अर्जुनी तालुका व सालेकसा तालुक्यातील गावांची पाहणी केली.
कोकणा/जमी. येथे सन २०१३-१४ वर्षाच्या ग्राम स्वच्छता अभियान तपासणीसाठी पथक काल (दि.३०) ४ वाजता कोकणा/जमी. गावात पोहचली.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे तपासणी पथकात उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष कुलदिप (धिरज) कदम पाटील उस्मानाबादचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाळने, पंचायतचे विस्तार अधिकारी संजय कुसाहीत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रमाकांत गायकवाड, डी.व्ही.कुलकर्णी, संग्राम मुंडे यांनी संपूर्ण गावाची तपासणी केली.
समितीचे स्वागत कोकणा/जमी. सरपंच लता चांदेवार, उपसरपंच शिवाजी गहाणे, स्वच्छता अभियान समितीचे अध्यक्ष खेमराज भेंडारकर, माजी पं.स.सभापती शिला भेंडारकर व सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान संदर्भात जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख व पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी टेंभरे यांच्या मार्गदर्शनात हा अभियान राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक उपसरपंच शिवाजी गहाणे यांनी केले. यात गावाचा आढावा, केलेल्या कामाची सविस्तर मुद्देसूद माहिती दिली.
जिल्हास्तरीय अभियान तपासणी यावेळी खंडविकास अधिकारी झेड.डी.टेंभरे, विस्तार अधिकारी सुरेंद्र धमगाये, आर.जी.उगले, शरद झामरे, धारगावे, चेतना नंदरधने, चित्रा बागडे, आर.डी.देशमुख, आनंदराव उईके, सुषमा वाढई, मंगला येरणे, मोरेश्वर ढोगडे, अरूण हातझाडे हे होते. संचालन ग्रामसेवक धर्मराज लंजे तर आभार कुलदीप कापगते यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

गांधीटोला येथेही स्वच्छता चमूची भेट
साखरीटोला : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१३-१४ करीता गावाची तपासणी करण्याकरिता उस्मानाबाद तपासणी चमूने नुकतीच सालेकसा तालुक्यातील गांधीटोला गावाला भेट देऊन गावाची पाहणी केली. या तपासणी चमूत उस्मानाबाद जि.प.चे अध्यक्ष धिरज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकली, पत्रकार संग्राम मुंडे, जयप्रकाश चौधरी, संतोष जाधव, रमाकांत गायकवाड, कळसाईत यांचा समावेश होता. २९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सदर चमू गांधीटोला येथे दाखल झाली. त्यावेळी गोंदिया जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, सरपंच रेखा फुंडे, सभापती हिरालाल, उपसरपंच भूमेश्वर मेंढे, तंमुस अध्यक्ष सुरेंद्र बैस, टी.जी.फुंडे, खंडविकास अधिकारी सालेकसा, विस्तार अधिकारी यु.टी.राठौड, ग्रामपंचायतचे सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संपूर्ण गावाची तपासणी करण्यात आली. गांधीटोला गावाला विभागस्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

Web Title: Examination of Village Cleanliness in the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.