मंजुरीपेक्षा अधिक मुरुमाचे उत्खनन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:50+5:302021-05-09T04:29:50+5:30

आमगाव : शहरात विविध भागांत सिमेंट रस्ते बांधकाम सुरू असून त्याकरिता मोठ्या प्रमाणात मुरुमाची आवश्यकता आहे. त्याकरिता ...

Excavation of more pimples than allowed () | मंजुरीपेक्षा अधिक मुरुमाचे उत्खनन ()

मंजुरीपेक्षा अधिक मुरुमाचे उत्खनन ()

Next

आमगाव : शहरात विविध भागांत सिमेंट रस्ते बांधकाम सुरू असून त्याकरिता मोठ्या प्रमाणात मुरुमाची आवश्यकता आहे. त्याकरिता कंपनीद्वारा रॉयल्टी घेऊन मोठ्या प्रमाणात मान्यतेपेक्षा अधिक प्रमाणात मुरुमाचे खोदकाम करून मान्य टिप्परपेक्षा अधिकचे टिप्पर लावून मुरुमाचे खोदकाम करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. अवैध उत्खनन करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी आमगाव येथील विविध संघटनांनी केली आहे.

आमगाव शहरातील रस्ते बांधकामाकरिता शिवालय कंपनी दिल्लीला दिनांक २६ एप्रिल २०२१ ला आदेश काढून मुरूम खोदकाम करण्यासाठी गट क्रमांक ३०४/ १ आर २.१८ मध्ये ५०० ब्रास मुरूम खोदकामाची परवानगी देण्यात आली; परंतु त्या पाच टिप्परला मुरूम वाहन करण्याची परवानगी देण्यात आली. त्याशिवाय २ टिप्पर अवैध मुरूम वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या २ टिप्परवर ४ लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश तहसीलदारांनी पारीत केले असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात कारवाई न केल्यास या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक नवीन जैन, जिल्हा सहसंयोजक बालाराम व्यास, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवळी, जनार्दन तडस, राजू बावनथडे यांनी दिला आहे.

Web Title: Excavation of more pimples than allowed ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.