जास्तीचे पाणीही आरोग्याला अपायकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:32 AM2021-09-23T04:32:44+5:302021-09-23T04:32:44+5:30
गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे ...
गोंदिया : शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते, परंतु ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात असले, तर त्याचे वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असते. पाणी घाम, मूत्राद्वारे शरीरातून बाहेर पडते. व्यायाम किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या मानसिकतेवर आणि शरीरावर विपरित परिणाम होते. हे डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. दोन लीटर पाणी पिण्याचा सल्ला सामान्यत: आरोग्य तज्ज्ञ देतात. तहान नसतानाही दिवसभर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोणत्या व्यक्तीने किती पाणी प्यावे, या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात. वातावरण, तापमान, आहार, स्तनपान करणारी महिला, गर्भवती यांनी किती पाणी प्यावे, या संदर्भातही आरोग्य तज्ज्ञ सल्ला देतात.
..................
शरीरात कमी पाणी पडले तर...
शरीरात गरजेपेक्षा कमी पडले, तर किडनीमध्ये वारंवार स्टोन होतात. त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता असते. कमी पाणी प्यायल्याने लघवीत इन्फेक्शन होते, त्यामुळेही आजार बळावतात. त्यासाठी पाणी कमी पिऊ नये.
..................
शरीरात जास्त पाणी झाले तर...
प्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे, अशी काही गरज नाही. वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज ५ ते ६ लीटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे, यामुळे अनेक आजार होतात. अत्याधिक पाणी सेवनानेही किडनी फेल होण्याची शक्यता असते.
........
कोणी किती प्यावे पाणी?
नवजात----५ ते ६ कप
१२ वर्षांपर्यंत- २.५ लीटर
१६ ते २९ वर्षांपर्यंत---२.५ लीटर
३० ते ४० वर्षांपर्यंत----३ लीटर
४१ ते ६० वर्षांपर्यंत----३ लीटर
६१ वर्षांपेक्षा जास्त----२.५ लीटर
..........
तज्ज्ञ काय म्हणतात..
२० टक्के पाणी अन्नापासून तर ८० टक्के पाणी पिण्यातून शरीराला मिळते. दिवसभरात अडीच ते तीन लीटर पाणी सेवन केल्यास लघुशंकेतून शरीरातील मळ बाहेर पडतो. त्यामुळे माणूस दिवसभर ताजातवाना राहतो. पाणी अधिक घ्यावे.
- डॉ.नोव्हील ब्राह्मणकर, युरोलॉजिस्ट गोंदिया.
............
गरजेपेक्षा कमी पाण्याचे सेवन झाले, तर वारंवार किडनीमध्ये स्टोन होऊ शकतात. लघवीचे इनफेक्शन वाढू शकते आणि त्यातून किडनीचे आजार बळाऊ शकतात. यासाठी भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला आम्ही देतो.
- डॉ.मयूर चौरे, युरोलॉजिस्ट गोंदिया.