खतांचा अतिवापर धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:33+5:302021-06-02T04:22:33+5:30

कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली पांढरी : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्त्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती ...

Excessive use of fertilizers is dangerous | खतांचा अतिवापर धोकादायक

खतांचा अतिवापर धोकादायक

googlenewsNext

कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली

पांढरी : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्त्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत ९ महिन्याचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.

नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त

देवरी : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ

सौंदड : शेतकरी रासायनिक खाताचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे आजारात वाढ झाली आहे. यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.

कार्यालयातून तक्रारपेट्या गायब

आमगाव : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. अशात आता तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

वर्षभरातच रस्ता उखडला

सडक-अर्जुनी : तालुक्यातील कोहळीटोला ते नरेटीटोला मार्ग उखडल्याने प्रवाशांना फारच त्रास सहन करावा लागत आहे. वर्षभरापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र अल्प कालावधीतच त्याची वाट लागली.

कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

सडक - अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा

गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.

बाजारातील रस्ते मोकळे करा

गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते अडचण होते.

रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत

अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडपांमुळे वाहन दिसत नाही. हे झुडुप अपघातांना कारणीभूत ठरत आहे.

Web Title: Excessive use of fertilizers is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.